जयसिंगपुरात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा दिमाखात संपन्न होणार – संजय पाटील यड्रावकर;२८ सप्टेंबरला पुतळ्याचा आगमन सोहळा

जयसिंगपुरात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा दिमाखात संपन्न होणार – संजय पाटील यड्रावकर;२८ सप्टेंबरला पुतळ्याचा आगमन सोहळा

जयसिंगपुरात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा दिमाखात संपन्न होणार – संजय पाटील यड्रावकर


२८ सप्टेंबरला पुतळ्याचा आगमन सोहळा

जयसिंगपूर : प्रतिनिधी
28 सप्टेंबर रोजी निळ्या वादळाच्या साक्षीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा सर्वांना सोबत घेऊन अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली,
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आगमन सोहळ्याची तयारी करण्यासंदर्भात माजी नगरसेवक, आंबेडकरवादी संघटनांचे शिरोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व भीमसैनिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संजय पाटील यड्रावकर बोलत होते, महापुरुषांचे पुतळे त्यांचे विचार व त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर ठेवण्यासाठी उभे केले जातात याच उद्देशाने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शहरात उभारला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी देखील सुरुवातीपासून त्यांनी पुढे राहून पुतळा उभारण्यासाठीचे सर्व प्रयत्न सातत्याने केले सर्वांना सोबत घेतले चर्चा केल्या, वेळोवेळी येणाऱ्या अडचणी याबाबत अवगत केले, सर्वांच्या संमतीने आता पुतळा उभारण्यात येणारी जागा निश्चित केली असे असताना काही मोजकी मंडळी सातत्याने या कामामध्ये अडथळे निर्माण करीत आहेत एका राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे या घटना घडत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे असे सांगताना संजय पाटील यड्रावकर यांनी प्रसंगी सध्या वेगळी भूमिका घेतलेल्या घटकांना मी पुन्हा भेटून सर्वांनी मिळून हे काम पुढे नेऊया आणि या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे विचार आणि कर्तुत्व नव्या पिढीसमोर नेऊया अशी विनंती करणार असल्याचे यावेळी सांगितले,
माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे व माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे यांनी आगमन सोहळ्यासाठीच्या तयारीची कमिटी तयार करण्याचे सर्वाधिकार संजय पाटील यड्रावकर यांनी घ्यावेत अशी विनंती केली, याच्या नियोजनाचा भाग म्हणून २१ सप्टेंबर पासून शिरोळ तालुक्याच्या प्रत्येक गावात शेकडो भीमसैनिक भीमज्योत घेऊन जाणार असल्याची माहिती बी आर कांबळे यांनी दिली, यावेळी एडवोकेट संभाजीराजे नाईक, एडवोकेट शितल कांबळे, सुरेश धरणगुत्तीकर, बजरंग खामकर, सुरेश कांबळे, सुनील कुरुंदवाडे, यांनी मनोगत व्यक्त करत असताना आगमन सोहळ्याचे स्वरूप कसे असावे याबाबतच्या काही सूचना मांडल्या, प्रा देवेंद्र कांबळे यांनी भीमसैनिकांचे 40 वर्षांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह संजय पाटील यड्रावकर यांचे आभार व्यक्त केले, गावागावातील आंबेडकर प्रेमी जनता व हजारो भीमसैनिक या सोहळ्यात सहभागी होतील असे सांगताना प्रेमाने आणि विश्वासाने सर्वांना सोबत घेऊ पण कोणी जाणून-बूजून आडवे येत असतील तर साम-दाम दंड भेद याचाही वापर करू असेही प्रा. देवेंद्र कांबळे यांनी ठणकावून सांगितले, माजी नगराध्यक्ष शिवाजी कुंभार, संभाजी मोरे, राजेंद्र नांद्रेकर, शितल गतारे, राजेंद्र आडके, शैलेश आडके, बाबासाहेब पाटील चिंचवाडकर, राजेंद्र झेले, अर्जुन देशमुख, सुरेश कांबळे, आनंदा शिंदे, बाळासाहेब कांबळे, संजय शिंदे डॉक्टर अनिरुद्ध कांबळे, अनुप मधाळे, सुरज शिंगे, धम्मपाल ढाले, उमेश आवळे, जी डी चव्हाण, रंगराव कांबळे, उल्हास भोसले, शरद कांबळे, अनिल लोंढे, सुनील कांबळे, भरत कांबळे, जॉन सकटे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *