स्वप्रेरित व्हा :डॉ. विजय मगदूम ,जे.जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

स्वप्रेरित व्हा :डॉ. विजय मगदूम ,जे.जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

स्वप्रेरित व्हा :डॉ. विजय मगदूम ,जे.जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत
जयसिंगपूर-येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, एम. टेक. तसेच एम. सी. ए. मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालक यांचा स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे दिवंगत चेअरमन कै.डॉ.जे. जे.मगदूम व कै. प्रभा जे. मगदूम यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली. प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. एम. बी. भिलवडे यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू विशद केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम होते. कार्यक्रमासाठी उद्योगपती श्री. अजित गटे, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व पी.डब्ल्यू.डी. चे कार्यकारी अभियंता श्री. क्रांतीकुमार मिरजकर, पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल ठाकूर, प्रा. युवराज पाटील,कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे उपस्थित होते.
आपण स्वायत्त्य महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे, एन.इ.पी. २०२० नुसारशैक्षणिक अभ्यासक्रमा सोबत,परदेशी विद्यापीठाशी सामंजस्य करार करून, नवीन तंत्रज्ञानयुक्त अभ्यासक्रम महाविद्यालयाने अंतर्भूत केला आहे. त्याचा फायदा प्लेसमेंट, विद्यापीठातील रँकर्स, परदेशात स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना निश्चित होईल असे प्रभारी प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील म्हणाल्या. विद्यार्थ्यांना चागले शिक्षण, सोई सुविधा सोबत चांगल्या प्लेसमेंट देण्याची ग्वाही कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांनी दिली.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व व्हॉइस चेअरपर्सन एड. डॉ.सोनाली मगदूम यांनी प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. चांगल्या प्लेसमेंट सोबत चांगले इन्फ्रास्ट्रक्चर देण्यामध्ये व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची कुचराई करणार नाही, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी नमूद केले.
आपण चांगल्या नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा चांगले उद्योजक होऊन इतरांच्या हाताला काम देऊ शकतो असे श्री. अजित गटे यांनी सांगितले, सोबतच काही विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या कंपनीमध्ये नोकरीची नियुक्तीपत्रे दिली. आपल्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा असून महाविद्यालयाचा मी ऋणी आहे असे गौरव उद्गार श्री. क्रांतीकुमार मिरजकर यांनी काढले.
मुलींनी धाडसी बनलं पाहिजे गरज वाटेल तिथे पोलीस प्रशासनाची मदत घेऊन समाजकार्यात झोकून दिले पाहिजे असे मत डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी व्यक्त केले. फेसबुक इंस्टाग्राम च्या पाठीमागे न लागता कष्टकरी आई-वडिलांची आठवण ठेवून, प्रेरित होऊन, धाडसी बनवून विद्यार्थ्यांनी वागलं पाहिजे तंत्रज्ञानात आपण कितीही मोठे झालो तरी आई-वडिलांचा विसर पडू देऊ नका असे मत प्रेरणादायी वक्ते प्रा. युवराज पाटील यांनी मांडले. पाटील सरांनी आपल्या ओघवत्या भाषेत उपस्थित पालकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सांस्कृतिक विभागाकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी,नवप्रवेशित विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाने विशेष परिश्रम घेतले आभार डीन-स्टुडंट्स प्रा.पी. पी. पाटील यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *