पुण्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकतेचा आवाज; शिवसेना-रिपब्लिकन सेना कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न

पुण्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकतेचा आवाज; शिवसेना-रिपब्लिकन सेना कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न

पुण्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकतेचा आवाज; शिवसेना-रिपब्लिकन सेना कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न

*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच रिपब्लिकन सेनेचे विवेक बनसोडे यांचे विशेष मार्गदर्शन

पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
शिवसेना रिपब्लिकन सेना पुणे शहर व जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळावा अंबर हॉल, कोथरूड येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याला विधानपरिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे व गृहराज्यमंत्री मा. योगेश कदम यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासह माजी आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, युवराज बनसोडे आणि विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. जिल्ह्यातील आणि शहरातील युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मेळाव्याच्या प्रारंभी स्वागतपरिचयानंतर संघटनेचे वर्तमान व भविष्यासंदर्भात सखोल चर्चा झाली. यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांचे मनोगत व्यक्त झाले. कार्यक्रमाचा समारोप उत्साहाच्या वातावरणात झाला.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये लोकप्रतिनिधी होण्याची क्षमता आहे. “नगरसेवक, आमदार, खासदार होण्याची ताकद आपल्यात आहे आणि या प्रवासामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा असलेला पक्ष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच खासदार आनंदराव अडसूळ यांना अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्याचा दाखला देत, सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम शिंदे गट सातत्याने करत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन दादर येथे पाडण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा विधानसभा व विधानपरिषदेत आम्ही ठामपणे लढा दिला. बाबासाहेबांच्या विचारांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहील,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. गोऱ्हे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकतेच्या संकल्पनेवर भाष्य करताना सांगितले की, हिंदुह्रदयसन्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेली ही संकल्पना आज वास्तवात उतरली आहे. “राजकारणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वासार्हता” असेही त्या म्हणाल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने ॲक्शन घेण्याची हमी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.कोकणाचे व जमा.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते होते तसेच ते कायम द्ृढ रहावे अशी ईच्छा व्यक्त केली.

या मेळाव्याच्या निमित्ताने पुण्यात शिवसैनिक आणि भीमसैनिकांच्या एकतेचा उत्साह पाहायला मिळाला. शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन्हींच्या सहकार्याने सामाजिक न्याय आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी या विचारांना अधिक बळ मिळत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

या वेळी विवेक बनसोडे अध्यक्ष विद्यार्थी सेना, युवराज बनसोडे कामगारसेना अध्यक्ष, हनुमंत पपुल अध्यक्ष पुणे, अजय भालशंकर युवक आघाडी, संजय देखणे उपाध्यक्ष, सुनील वाकेकर प्रवक्ते, आशिष गाडे सरचिटणीस, निलेश गायकवाड जिल्हा अध्यक्ष, विशाल म्हस्के जिल्हा अध्यक्ष, डॉ अझीम शेख महाराष्ट्र सचिव अल्पसंख्यांक, उद्धव कांबळे विभागप्रमुख पर्वती यांच्यासह शिवसेनेचे नाना भानगिरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर , सुदर्शना त्रिगुणाईत, किरण साळी, राजेश पळसकर , संदीप शिंदे आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *