आजपासून शिरोळ तालुक्यात भीमज्योत परिक्रमा
भीमज्योतीचे प्रत्येक गावात होणार उत्साहात स्वागत
जयसिंगपूर :
शिरोळ तालुक्याने पन्नास वर्षांपासून पाहिलेले स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरत आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्यानिमित्त तालुक्यातील सर्व गावांतून भव्य भीमज्योत परिक्रमा काढण्यात येणार आहे. पंचायत समिती आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या भीम ज्योत परिक्रमेची सुरुवात होणार आहे.
जयसिंगपूर नगरपरिषदेमार्फत डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ४ वा. जयसिंगपूर शहरात भव्य मिरवणुकीतून पुतळ्याचा आगमन सोहळा होणार आहे. या आगमनापूर्वी तालुक्यातील गावोगावी भीमज्योत परिक्रमा निघणार असून, प्रत्येक ठिकाणी मुक्काम, भोजनदान व प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
२१ रोजी सकाळी १० वा. शिरोळ, ११ वा. शिरटी, १२ वा. हसूर, १ वा. कनवाड, २ वा. कुटवाड, ४ वा. घालवाड, ५ वा. अर्जुनवाड, ६ वा. चिंचवाड, मुक्काम: उदगाव, २२ रोजी सकाळी १० वा. उमळवाड, ११ वा. कोथळी, १ वा. दानोळी, २ वा. कवठेसार, ३ वा. जैनापूर, ५ वा. निमशिरगाव, ६ वा. तमदलगे, मुक्काम: चिपरी, २३ रोजी सकाळी १० वा. कोंडीग्रे, ११ वा. यड्राव, १२ वा. जांभळी, १ वा हरोली. शिरढोण, २ वाजता ,टाकवडे, ४ वा. टाकवडे वेस इंचलकरंजी ५ वा. , मुक्काम: शिरदवाड, २४ रोजी सकाळी १० वा. अब्दुल लाट, ११ वा. तेरवाड, १२ वा. हेरवाड, २ वा. घोसरवाड, ३ वा. दत्तवाड, ४ वा. दानवाड, ६ वा. खिद्रापूर, ७ वा. राजापूर, मुक्काम: सैनिक टाकळी, २५ रोजी सकाळी १० वा. टाकळीवाडी, १२ वा. अकिवाट, २ वा. बस्तवाड, ३ वा. मजरेवाडी, ५ वा. कुरुंदवाड, मुक्काम: औरवाड, २६ रोजी सकाळी १० वा. बुबनाळ, ११ वा. आलास, २ वा. गणेशवाडी, ३ वा. शेडशाळ, ४ वा. कवठेगोलंद, ५ वा. गौरवाड, मुक्काम: नृसिंहवाडी, २७ रोजी १० वा. शिरोळ, १२ वा. नांदणी, २ वा. धरणगुत्ती, ४ वा. मौजे आगर, मुक्काम: संभाजीपूर
प्रत्येक गावातील मुक्कामस्थळी समाजजागृती कार्यक्रम, व्याख्याने, आणि भोजनदानाची सोय करण्यात आली आहे. परिक्रमेच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुता व समतेचा संदेश दिला जाणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक परिक्रमेने संपूर्ण शिरोळ तालुका एकवटला असून प्रत्येक गावात उत्साहाचे वातावरण आहे. हजारो भीमसैनिक यात सहभागी होत आहेत. जयसिंगपूर शहरात होणारा पुतळ्याचा आगमन सोहळा हा तालुक्याच्या इतिहासातील अभूतपूर्व क्षण ठरणार आहे. तरी शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील भीमसैनिकांनी या भीम ज्योत परिक्रमेचे स्वागत उत्साहात करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुतळा समितीचे समन्वयक बाळासाहेब कांबळे व सुरेश कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.