कष्टकरी , शेतमजूर समाज ग्रामीण भागाचा महत्वाचा कणा-चेअरमन माधवराव घाटगे ; महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचा मेळावा संपन्न.

कष्टकरी , शेतमजूर समाज ग्रामीण भागाचा महत्वाचा कणा-चेअरमन माधवराव घाटगे ; महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचा मेळावा संपन्न.

कुरुंदवाड प्रतिनिधी : ग्रामीण भागातील कष्टकरी व शेतमजूर समाज प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा चालवत असतात. या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सुरेश सासणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे . कष्टकरी शेतमजूर हाच ग्रामीण भागाचा महत्त्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले. तेरवाड येथे महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. घाटगे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर भाजपा चे जिल्हाअध्यक्ष राजवर्धन नाईक – निंबाळकर होते.

पुढे बोलताना घाटगे म्हणाले, घरातील चांगल्या संस्कारातूनच संस्कारक्षम पिढी घडवू शकते. त्यासाठी कुटुंबातील जेष्ठांचा पुढकार महत्वाचा आहे .जीवनामध्ये पैसा हे जीवन जगण्याचे साधन असून ते अंतिम साध्य नाही. त्यामुळे प्रत्येकाने आनंदी व समाधानी जीवन जगले पाहिजे.

पश्चिम महाराष्ट्र राज्य शेतमजूर व कष्टकरी संघटनेच अध्यक्ष सुरेश सासणे म्हणाले,संजय गांधी श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचे पेन्शन १५०० रुपये वरून २५०० रुपये करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले आहे.पेन्शन वाढीच्या या महत्त्वाच्या लढ्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील , गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले ,पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कष्टकरी शेतमजूर यांच्यासाठी अनेक समाज उपयोगी योजना राबवून त्यांना आधार देण्याची काम केले आहे. यावेळी कार्यक्रमाला गुरुदत्त शुगर्स चे संचालक शिवाजीराव माने – देशमुख शिवाजी सांगले , विश्वास बालिघाटे, पॅंथर आर्मीचे संस्थापक संतोष आठवले , शोभाताई पाणदारे यांच्यासह कष्टकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

फोटो लाईन –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून निराधार यांच्या पेन्शन वाढीसाठी विशेष प्रयत्न केली बद्दल महाराष्ट्र राज्य शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांचा सत्कार सुरेश सासणे यांच्या हस्ते करण्यात आला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *