ड

कोल्हापूर, दि. १५ (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती व इंजिनीयर डे निमित्य एम.आय.डी.सी.चे कार्यकारी अभियंता आय.ए. नाईक यांच्या हस्ते सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अभियंता दिनाचे औचित्य साधून अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे डेप्युटी इंजिनीयर अजयकुमार रानगे व डेप्युटी इंजिनियर अमित भुरले यांना एम.आय.डी.सी.चे कार्यकारी अभियंता आय.ए. नाईक यांच्या हस्ते उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदे मध्ये बांधकाम विभागातील शाखा अभियंता ज्ञानेश्वर कांबळे व शाखा अभियंता भारत कांबळे यांचाही उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी परिवर्तन फाउंडेशन चे अध्यक्ष अमोल कुरणे, दिगंबर कुलकर्णी,अभियंता आर.आर. पाटील, प्रशांत डफाडे, एम.आय.डी.सी. चे एरिया मॅनेजर नितीन शिंदे, शैलेश कुरणे, उद्योजक दुधाळे, शिरीष शिंदे, आरेखक बाळसाहेब सदामते, संतोष सुतार, श्रद्धा पाटील, आनुरेखक नवनाथ दुधाळे, मंदार कुलकर्णी, प्रणव खांडेकर, राम गुरव, कुमार इंगवले, मनोहर जारकोळी, नेताजी कुंभार, अभिजीत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.