कोल्हापूर जिल्हा RPI (आठवले गट) उपाध्यक्ष पदी आयु. जयपाल कांबळे यांची निवड
टाकळीवाडी प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) उपाध्यक्ष पदी आयु. जयपाल कांबळे यांची निवड झाली असून, जिल्हाभरातून त्यांच्या या निवडीचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
आयु. जयपाल कांबळे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा मोठा भाग उपेक्षित, वंचित आणि दलित समाजाच्या हक्क व सन्मानासाठी झोकून दिला आहे. गेली अनेक दशके त्यांनी जवळपास 90% कार्य समाजकारणासाठी समर्पित केले असून, त्यांच्या अथक प्रयत्नांची आज पावती म्हणून हा मानाचा सन्मान मिळाल्याचे मानले जात आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील सामाजिक चळवळींना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यानंतरही ते समाजकारण आणि सेवा कार्यात नवी उर्जा घेऊन योगदान देतील, असा विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.