जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करीत भीमज्योत परिक्रमेचे स्वागत
कोंडीग्रे, यड्राव, जांभळी, हरोली, शिरढोण, टाकवडे, शिरदवाड मध्ये परिक्रमेला मोठा प्रतिसाद
जयसिंगपूर :
जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण, ज्योत परिक्रमेत महिलांचा सहभाग, फटाक्यांची आतषबाजी, हलगीचा कडकडाट आणि जय भीमच्या जयघोषात मंगळवारी कोंडीग्रे, यड्राव, जांभळी, हरोली, शिरढोण, टाकवडे, इचलकरंजी टाकवडे वेस आणि शिरदवाड येथे भीमज्योत परिक्रमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. भीम ज्योत परिक्रमेच्या तिसऱ्या दिवशी शिरोळ तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. यड्राव येथे भीमसैनिकांनी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करून परिक्रमेचे आगळे – वेगळे स्वागत केले. इतर गावात हलगीच्या कडकडाटात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि फुलांच्या उधळणीतून भीमज्योतीचे स्वागत करण्यात आले.
गावागावांत महिलांनी सामूहिक ज्योत परिक्रमा काढत या ऐतिहासिक क्षणात सहभाग नोंदवला. तरुणाईने सजवलेल्या वाहनफेऱ्या, रांगोळ्या, यामुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता. जय भीमच्या घोषणा आणि हलगीच्या ठेक्यांवर भीमसैनिकांच्या टाळ्या, घोषणांनी गावागावांतून वातावरण दणाणून गेले.
प्रत्येक गावात समाजजागृतीसाठी प्रबोधनपर कार्यक्रम व सामूहिक भोजनदानाचे आयोजन झाले. परिक्रमेने सामाजिक बांधिलकी, बंधुता आणि समतेचा संदेश देत गावोगावांतील नागरिकांना एकत्र आणले.
गेल्या पन्नास वर्षांपासून शिरोळ तालुक्याचे स्वप्न असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अखेर साकार होत असल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटला होता. परिक्रमेच्या माध्यमातून ऐक्याची भावना दृढ होत असून २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता जयसिंगपूर शहरात होणाऱ्या पुतळ्याच्या भव्य आगमन सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे. तिसऱ्या दिवशीची भीमज्योत परिक्रमा शिरोळ तालुक्यात सामाजिक परिवर्तन, उत्साह आणि बंधुतेचे आगळेवेगळे प्रतीक ठरले.
याप्रसंगी रमेश शिंदे, बाळासाहेब कांबळे, सुरेश कांबळे, आनंदा शिंगे, बी.आर. कांबळे, मिलिंद शिंदे, सेनापती भोसले, कैलास काळे, जॉन सकटे, सागर बिरणगे, जयपाल कांबळे, किरण भोसले, बाळासाहेब कांबळे (नांदणी) यांच्यासह कोंडीग्रे येथे नानासो कांबळे, लखन कांबळे, संदीप कांबळे, केतन कांबळे, मंगल कांबळे, राणी कांबळे, कोमल कांबळे, प्रियांका कांबळे, जयदीप पाटील, बाळासाहेब हांडे, किरण भोसले, योगेश खिलारे, अण्णासाहेब बिलोरे, यड्राव येथे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर, आर. जी. कांबळे, माजी सरपंच उल्हास भोसले, सरदार सुतार, राहुल पवार, प्रकाश अकिवाटे, प्रमोद कांबळे, शिवाजी दळवी, शिशुपाल प्रभावळकर, शिवानंद बिदरी, हारोली येथे सरपंच तानाजी माने, राजगोंडा पाटील, नेमिनाथ चौगुले, सुनील पाटील, राजकुमार कांबळे, रोहित कांबळे, चेतन कांबळे, प्रज्वल कांबळे शिरढोण येथे सागर भंडारे, चंद्रकांत मोरे, कल्लाप्पाण्णा कोईक, विद्यासागर पाटील, विकास कांबळे, पोपट पुजारी, गितन यादव, प्रवीण दानोळे, प्रमोद कांबळे, रवी कांबळे, विश्वास बालीघाटे, राजू नदाफ, यशवंत कुंभार, अजित चौगुले, संतोष कोरे, टाकवडे येथे प्रफुल कांबळे, विनायक कांबळे, पोलीस पाटील सारिका कांबळे, प्रभाकर कांबळे, रोहित पाटील, सुरेश कांबळे, बाळासाहेब बंटी पाटील, बाळासाहेब शिंदे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.