डॉ. मगदूम अभियांत्रिकीला गुगलच्या भास्कर मंगलापल्ली यांची भेट:-टेक स्पार्क २०२५ : विध्यार्थ्यांना तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ

डॉ. मगदूम अभियांत्रिकीला गुगलच्या भास्कर मंगलापल्ली यांची भेट:-टेक स्पार्क २०२५ : विध्यार्थ्यांना तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ

*

डॉ. मगदूम अभियांत्रिकीला गुगलच्या भास्कर मंगलापल्ली यांची भेट:-टेक स्पार्क २०२५ : विध्यार्थ्यांना तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ

     जयसिंगपूर : डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे ‘टेक स्पार्क २०२५’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देश-विदेशातील नामांकित तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते व प्रकल्प व्यवस्थापक विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी उपस्थित होते.
      कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर मंगलापल्ली (गूगल इंजिनिअरिंग मॅनेजर), अरीन साहू (प्रोजेक्ट मॅनेजर, डेल टेकनॉलॉजिस), पृथ्वीराज भोसले (डेटा इंजिनिअर, ऑपटूम), अनमोल अरोरा (सॉफ्टवेअर इंजिनिअर, मायक्रोसॉफ्ट) तसेच जतिन राणा (डेटा इंजिनिअर, नोवर्तीस) उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय मगदूम ( चेअरमन डॉ. जे.जे.मगदूम ट्रस्ट) होते.
                तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगती, डेटा इंजिनिअरिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कम्प्युटिंग यांसारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच, जागतिक स्तरावर करिअर घडवण्यासाठी कष्ट, योग्य दिशा, सातत्यपूर्ण शिक्षण व कौशल्य विकास किती महत्त्वाचा आहे याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
        कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले. पाहुण्यांनी स्वतःच्या अनुभवांमधून वास्तव उदाहरणे देत विद्यार्थ्यांचे शंकानिरसन केले. उद्योगविश्वात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास, टीमवर्क व नवोन्मेषी विचारसरणी हे घटक तितकेच आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
      प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी  पाहुण्यांचे स्वागत करून त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच भविष्याकरिता नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
      ‘टेक स्पार्क २०२५’ या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता वाढली असून, अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी होण्यास हातभार लागेल, असे सर्व उपस्थितांचे मत होते.
  कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी  चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअर पर्सन डॉ.सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांचे प्रोत्साहन मिळाले  प्रा. सौरभ खानावले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रोहित माने(ट्रेनिंग अँड प्लेसमेंट क्लब), प्रा. पौर्णिमा माने पाटील( कोडींग क्लब ), प्रा.गौसिया देसाई (जी. डी. जी. क्लब),

प्रा. माधुरी जाधव,व्ही. ए. पाटील, एन.बी.पाटील, पी. पी. कदम, प्रा. मोनिका नागावकर, सर्व विभाग प्रमुख, स्टाफ व विद्यार्थ्यांनी काम पाहिले.
विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने कार्यक्रम यशस्वी झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *