महाराष्ट्र गौरव पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवर सन्मानित
कोल्हापूर, दि. ३० (प्रतिनिधी) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची, बाजीराव गावकर यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये सेवानिवृत्त कस्टम ऑफिसर, मुंबईतील सागरी अटल सेतूचे प्रथम प्रवासी व पौर्णिमा फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी सेवा कार्य करणारे मदन पवार, दाजीबा व फ्रीजिओ आईस्क्रीम, हॉटेल आपुलकी आदी राजतारा फुड्स उद्योग समूहाचे मालक राजेंद्र पाटील, छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते नामदेव नागटिळे, रिटायर्ड ए. एस. आय. तात्यासाहेब कांबळे, कोतोली को. ऑप. क्रेडिट सोसायटी चे व्हाईस चेअरमन, सी पी आर हॉस्पिटल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय क्षीरसागर, मंथन फौंडेशन चे अध्यक्ष आणि मंथनवेदा वेलनेस जंक्शन चे डॉ. रविंद्र वराळे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, सर्वधर्मीय जयंती समिती व नाना नानी पार्क चे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कुलकर्णी, कोल्हापूर थाळी उपक्रमाचे उदय प्रभावळे, राज्यक्रांती उद्योग समूहाचे युवा उद्योजक राजवर्धन कुरणे यांच्यासह इतर मान्यवरांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.