महात्मा गांधी जयंतीनिमित्त परिवर्तनवादी संस्थांतर्फे अभिवादन
कोल्हापूर : पापाची टिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास विविध परिवर्तनवादी संस्थांतर्फे ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गांधीजीं नी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशातील चळवळींना अहिंसेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी नेल्सन मंडेला, मार्टिन लूथर किंग यांसारख्या नेत्यांनाही प्रेरणा मिळाली असल्याचे प्रतिपादन ॲड. धनंजय पठाडे यांनी गांधी जयंती प्रसंगी व्यक्त केले .
दरवर्षी २ ऑक्टोबरला भारतासह संपूर्ण विश्वात महात्मा गांधींची जयंती साजरी केली जाते. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अहिंसात्मक अभूतपूर्व योगदानामुळे त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून ओळखले जाते.
सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. या कार्यामुळे ते भारतीयांचे प्रेरणास्त्रोत ठरले आहेत
आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण गांधीजींच्या जीवनमूल्यांचा अंगीकार करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करूया असे मनोगत ॲड. पठाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुरणे,संभाजी चौगुले, पंडितराव चौगुले खंडोबा तालमीचे शेखर पोवार, कुमावत सोसायटीचे सतीश बाचणीकर, फौजी ग्रुपचे ज्ञानेश्वर मोहिते, अरुण जमादार, उत्कर्ष भंडारे, जे बी अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.