सांगली सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर 1000 कामगारांचे जोरदार ठिय्या आंदोलन.

सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे सर्व थकीत अर्ज त्वरित मंजूर करावेत, दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना किमान पाच हजार रुपये बोनस मिळावा, अर्ज केलेल्या सर्वांना घरांच्यासाठी अनुदान त्वरित मिळावे, विधवा महिलांचे थकित मानधन आग्रहक्काने देण्यात यावे अशा मागण्यांच निवेदन सांगली सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांना देण्यात आले.

निवेदनासंदर्भात बोलताना मुजावर यांनी सांगितले की संघटनेच्या वतीने दिलेले निवेदन पुणे विभागीय उपायुक्त, मुंबई कामगार आयुक्त व बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्याकडे तातडीने पाठवण्यात येईल.
सध्या सांगली जिल्ह्यामध्ये प्रलंबित अर्जांची संख्या 40000 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे लाभ देण्याचे अर्ज जानेवारीपर्यंत तपासलेले आहेत. राहिलेले सर्व अर्ज जितक्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर तपासून कामगारांना लाभ वाटप करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
सध्या सांगली जिल्ह्यामध्ये नवीन नोंदणीसाठी व नूतनीकरणासाठी जे अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत त्यांची ही मंजुरीची प्रक्रिया दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात येईल.
विधवा महिलांच अर्ज प्रलंबित असल्यास त्याबाबत संघटनेने कार्यालयाची संपर्क करावा त्यांचे अर्ज त्वरित मंजूर करून पाठवण्यात येतील. असेही सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांनी सांगितले.
घर बांधण्यासाठी अनुदान मिळण्याचे अर्ज स्वीकारलेल आहेत तरी त्याबाबत काही त्रुटी असल्यास संबंधित लाभार्थीने कार्यालयाशी संपर्क करावा त्यांचे अर्ज मंजूर करून पाठवण्यात येतील.
प्रतिज्ञापत्रासाठी बांधकाम कामगारांना व विधवा महिलांना पाचशे रुपयेचा स्टॅम्प पेपर विविध योजनांसाठी लावावा लागतो. त्याबाबतचा निर्णय शासकीय निर्णयानुसार घेण्यात यावा असे पत्र पाठवण्यात येईल. असे मुजावर यांनी सांगितले. यापूर्वीच त्यांनी बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे महाराष्ट्र शासनाचा आदेश असल्याने प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क आकारू नये असे पत्र पाठवलेल आहे. त्याबाबतही पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले.
सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर हे स्वतः ऑफिस समोर येऊन त्यांनी सर्व कामगारांशी संवाद साधला व घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती सर्व जमलेल्या कामगारांना दिली याबद्दल संघटनेच्या वतीने कॉ शंकर पुजारी यांनी श्री मुजावर यांचे मनःपूर्वक आभार मानले.
बांधकाम कामगारांचे आंदोलन संघटित करण्यामध्ये कॉ विशाल बडवे संतोष बेलदार, विजय पाटील, शुभांगी गावडे ,पांडुरंग वसगडेकर, पांडुरंग मदने, मोहन जावीर, सलीम इनामदार शबिदा शेरकर,सतीश सूर्यवंशी, श्रुती नाईक, ज्योती सिसाळे, परवीन इनामदार. शुभम पाटील, वैभव बडवे, जाहिद मोमीन ,जगदीश निरगुडे इत्यादींनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला.