अभिजात मराठी भाषा सप्ताहाअंतर्गत संस्था व साहित्यिक भेट उपक्रम संपन्न
इचलकरंजी ता. ७ बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संचलित राजश्री शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय (रुकडी) या संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजात मराठी भाषा सप्ताहाअंतर्गत संस्था व साहित्यिक भेट या उपक्रमात समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाला भेट दिली. प्रा. गिरीश मोरे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांच्याशी विद्यार्थ्यांनी साहित्यिक गप्पा मारल्या. तसेच त्यांची लेखक, संपादक , कवी,गझलकार, वक्ता म्हणून गेल्या चाळीस वर्षाची वाटचाल प्रश्नोत्तराद्वारे जाणून घेतली. ही मुलाखत जवळजवळ दीड तास रंगली.
समाजवादी प्रबोधिनी,प्रबोधन वाचनालय आणि राजश्री शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला होता. सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी आणि कविता डांगरे यांनी प्रबोधन वाचनालयाची माहिती दिली आणि सर्वांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. यावेळी सिद्धेश कोरे, दिशांत लोखंडे ,उदय बनकर ,आयुष बागडी ,ऋतुजा मोटर, मनीषा कोळी, नाझिया जमादार ,स्वप्नाली जाधव ,अमृता खोत ,श्रुती निकम या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी चर्चेत सहभाग घेतला. प्रा. डॉ.लता मोरे यांनी आभार मानले.