हातकणंगले पंचायत समिती सदस्य पद निवडणूक सौ प्रिया शीतल कांबळे लढवण्याची शक्यता….!
हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांची ओळख असणारे शीतल कांबळे यांच्या पत्नी सौ प्रिया कांबळे ह्या पंचायत समिती निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत गावातील तसेच रुकडी सारख्या मोठया गावातिल जनतेच्या विश्वासच्या बळावर त्यानी ही निवडणूक लढवणार असल्याचे प्रसार माध्यमातून प्रसिद्ध केले आहे, त्यांना जनतेतून उत्साह व प्रेरणा मिळत असल्याचे त्या बोलत होत्या,त्यांचे कार्य सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय असे आहे तसेच सर्वांच्या सुख दुःखात कायम सहभागी असतात,त्यांचे पती प्रत्येक कार्यात नेहमी अग्रेसर असतात जसं कोरोना काळात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या चारचाकी गाडीतून रुग्णांना कोरोना केअर सेंटर ला विनमोबदला पोहचवण्याचं पुण्याचं कार्य त्यानी केलं अश्या अनेक समाज कार्य त्यांनी केलेत कदाचित या कार्याची दखल जनता नोटीस करून त्यांना पंचायत समिती निवडणूक लढवण्यास प्रोत्साहन देत आहे कि काय?त्यांच्या घराण्यात एक महिला सरपंचपद भूषविले आहे त्यांचीच प्रेरणा आणि प्रोत्साहन त्यांना मिळाले असल्याची चर्चा आहे, प्रिया कांबळे यांनी देखील आपल्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाने मोठया संख्येने महिला वर्ग सांभाळून ठेवला आहे त्यामध्ये बचत गट असेल किंवा इतर सामाजिक कार्यें त्यांच्या हातून घडली आहेत वृक्षारोपण, तसेच शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच महिलांसाठी अनेक शासकीय योजने चा लाभ मिळवून देण्याचे काम त्यांनी केलेलं आहे आपल्या भक्कम कार्याच्या जोरावर त्या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.