दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची भेट

दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची भेट

   

दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची भेट

दिवंगत पुरण कुमार यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

मुंबई / चंदिगड दि.13 ~ हरियाणा कॅडर चे सन 2001 च्या बॅच चे आय पी एस अधिकारी वाय.पुरण कुमार यांनी 7 ऑक्टोबर ला आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले आहे.मात्र त्यातील एका ही अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. जो पर्यंत दिवंगत पुराणकुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तो पर्यंत दिवंगत पुरण कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाल्याची भूमिका हरयाणातील दलित समाजाने घेतली आहे.त्यामुळे दिवंगत पुरण कुमार यांनी ज्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे त्या अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करून चौकशी करावी या मागणी साठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी
हरियाणा चे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याशी झालेल्या चर्चेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागणी केली आहे की दिवंगत वाय.पुरण कुमार यांच्या पार्थिवाचे आधी पोस्ट मॉर्टम करावे त्यानंतर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.दुसरीकडे सर्व दलित समाजाची मागणी आहे की आधी जबाबदार जातीवादी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी त्यानंतरच दिवंगत पुरण कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.या तिढ्यामुळे मागील 6 दिवसापासून दिवंगत पुरण कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत.हा अत्यंत गंभीर प्रकार असून मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी तात्काळ हा तिढा सोडवून आरोपी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.
चंदिगड येथील दिवंगत आय पी एस अधिकारी पुरण कुमार यांच्या निवासस्थानी ना. रामदास आठवले यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी दिवंगत पुरण कुमार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ना.रामदास आठवले यांनी वाहिली.यावेळी दिवंगत पुरण कुमार यांच्या पत्नी अमनित पी कुमार आणि पुरण कुमार यांचा भाऊ यांचे ना.रामदास आठवले यांनी सांत्वन केले. पुरण कुमार यांच्या पत्नी अमनित पी कुमार या आय ए एस अधिकारी आहेत.
दिवंगत पुरण कुमार यांनी चिठ्ठीत लिहिलेल्या 11 अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर एट्रोसिटी ऍक्ट नुसार कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.

देशात दलितांना पाठिंबा देणारे मोठ्या प्रमाणात सवर्ण लोक आहेत.मात्र अजूनही काही प्रमाणात जातीवादी मनोवृत्तीचे लोक आहेत.जातुवदातून पडणारे बळी रोखले पाहिजे.दलित अधिकाऱ्यांना सन्मानाची चांगली वागणूक देण्याचे काम सवर्ण अधिकाऱ्यांनी केले पाहिजे.जातीवाद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशा शब्दांत ना. रामदास आठवले यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *