डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशनतर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा; मान्यवरांची उपस्थिती
हातकणंगले/आळते: शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशन, हातकणंगले यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ (वर्ष १२ वे) चा वितरण सोहळा रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री क्षेत्र कुंथूगिरी, आळते येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक सन्माननीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सन्माननीय मान्यवरांची उपस्थिती:
या पुरस्कार सोहळ्याला नामदार श्री. प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच, खासदार श्री. धैर्यशील माने, आमदार श्री. विनय कोरेसो, आमदार श्री. राहुल आवारेसो, आमदार श्री. नविद मुश्रीफसो, आमदार श्री. प्रवीण यादवसो, आमदार श्री. दिपक शिंदेसो, आमदार श्री. अविनाश बनगेसो यांचीही सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय आमदार श्री. राजेश क्षीरसागरसो, आमदार श्री. राजेंद्र पाटील यड्रावकरसो, आमदार श्री. चंद्रदीप नरकेसो, आमदार श्री. रविंद्र मानेसो, आमदार श्री. अरुणासव इंगवलेसो, आमदार श्री. सुशील बेल्हेकरसो, आणि आमदार श्री. अजित सुतारसो यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.
वेळ व स्थळ:
- वेळ: रविवार, १२ ऑक्टोबर २०२५, सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत.
- स्थळ: श्री क्षेत्र कुंथूगिरी, आळते, ता. हातकणंगले.
डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशनच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील ‘सन्मान सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील वारसाचा’ जपणूक करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. फाउंडेशनचे संचालक श्री. दीपक मोरे, श्री. अभिनंदन साळुंखे, श्री. शशिकांत मिणचेकर, श्री. सागर चोपडे यांच्यासह शिवसेना, युवासेना, भिमशक्तीचे कार्यकर्ते, हातकणंगले तालुक्यातील प्रतिष्ठित मान्यवर, सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट व सदस्य मतदार बंधू-भगिनी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले आहे.
तरी या महत्त्वपूर्ण पुरस्कार वितरण सोहळ्यास शिक्षण प्रेमी, नागरिक व संबंधितांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशन, हातकणंगले यांच्यावतीने करण्यात आले आहे.
(संर्घषनायक मीडिया – वृत्तसंकलन)