: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आमदारांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने’तून प्रत्येकी २ कोटींचा निधी वितरित
मुंबई: सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने’तून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभा सदस्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्वरित वितरित केला आहे. या निधीमुळे मतदारसंघातील दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामे करण्याला गती मिळणार आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून ही योजना दलित वस्त्यांच्या विकासासाठी राबविली जाते, ज्यातून लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक विकासासाठी निधी दिला जातो. गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींकडून या निधीची मागणी जोर धरू लागली होती.
उपलब्ध निधी आणि आमदारांकडून असलेली मागणी यांचा समतोल राखत मंत्री श्री. शिरसाट यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी प्रत्येक आमदाराला २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तो तात्काळ वितरित केला आहे. हा निधी वितरित झाल्यामुळे मतदारसंघातील दलित वस्त्यांमधील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल आणि ही कामे मार्गी लागतील, असे मत मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी व्यक्त केले.
दिवाळीच्या तोंडावर हा निधी मिळाल्याने विकासकामांना चालना मिळणार असून, यामुळे वस्त्यांच्या विकासासाठी केलेल्या मागणीची पूर्तता झाल्याचे समाधान आमदारांमध्ये व्यक्त होत आहे.
Posted inमहाराष्ट्र
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आमदारांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने’तून प्रत्येकी २ कोटींचा निधी वितरित
