: ‘लोकशाही संविधान सन्मान महामोर्चा’च्या प्रचाराला गती; कोल्हापूरसह तीन तालुक्यांमध्ये जनजागृती
कोल्हापूर: (प्रतिनिधी) लोकशाही आणि संविधानाच्या सन्मानासाठी येत्या 27 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील बिंदू चौकात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाही संविधान सन्मान महामोर्चा’च्या प्रचाराला आजपासून (21 ऑक्टोबर) गती देण्यात आली आहे. महामोर्चाच्या व्यापक जनजागृतीसाठी पन्हाळा, शाहूवाडी आणि गगनबावडा या तीन तालुक्यांमध्ये आजपासून विशेष प्रचार यंत्रणा राबवली जात आहे.
आज तीन तालुक्यांत प्रचार:
महामोर्चाच्या प्रचारासाठी आज, 21 ऑक्टोबर रोजी पन्हाळा, शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यांतील गावोगावी फिरून जनजागृती केली जात आहे. या प्रचार यंत्रणेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आयुष्यमान बी. के. कांबळे सो. आणि मा. जयसिंग जाधव यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
उद्याचे प्रचार नियोजन (22 ऑक्टोबर):
प्रचार यंत्रणेला अधिक गतिमान करण्यासाठी उद्या, 22 ऑक्टोबर रोजी दिवसभर विविध ठिकाणी बैठका आणि संपर्क अभियाने आयोजित करण्यात आली आहेत.
- सकाळी 10 वाजता: बिंदू चौक, कोल्हापूर येथे आयोजित बळीराजा महोत्सवाच्या ठिकाणी माननीय दिगंबर लोहार आणि प्रा. डॉ. विजय काळेबाग सर यांच्याशी संपर्क साधून महामोर्चाच्या प्रचाराची यंत्रणा गतिमान करावी.
- दुपारी 12 वाजता: भोगावती सहकारी साखर कारखाना गेस्ट हाऊस, ता. करवीर येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी आयुष्मान पांडुरंग कांबळे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी (गवई)) आणि वंचित बहुजन आघाडीचे मान. जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे तसेच रिपब्लिकन पक्षाचे मा. सुरेश कांबळे उपस्थित राहणार आहेत.
- दुपारी 3 वाजता: गारगोटी, ता. भुदरगड येथे सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी माननीय नामदेव कांबळे, मा. बबन कांबळे आणि मा. श्रीकांत कांबळे नाधवडेकर यांच्याशी संपर्क साधावा.
सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन:
लोकशाही संविधान सन्मान महामोर्चाच्या प्रभावी प्रचार व प्रसारासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेगण आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे कळकळीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.