अवयव तस्करीतील सहा डॉक्टर सापडेनात; पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात, दोघांचा जामीनासाठी अर्ज!

अवयव तस्करीतील सहा डॉक्टर सापडेनात; पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात, दोघांचा जामीनासाठी अर्ज!

अवयव तस्करीतील सहा डॉक्टर सापडेनात; पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात, दोघांचा जामीनासाठी अर्ज!
अहिल्यानगर: येथील एका रुग्णाच्या कथित अवयव तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सहा आरोपींपैकी एकाही डॉक्टरला अटक करण्यात अहिल्यानगर पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे पोलिसांच्या तपासावर आता संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या सहा आरोपींपैकी डॉ. गोपाळ बहुरूपी आणि डॉ. सुधीर बोरकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
२०२० मधील एका रुग्णाच्या उपचारादरम्यान मृत्यू आणि त्यानंतर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत रुग्णाच्या मुलाने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार तोफखाना पोलिसांनी पाच डॉक्टर आणि एका लॅब तंत्रज्ञासह सहा जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये कटकारस्थान, फसवणूक आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, रुग्णावर जाणीवपूर्वक चुकीचे उपचार करून, मृत्यूनंतर अवयव तस्करीच्या हेतूने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.
सहाही आरोपी फरार, तपास थंड बस्त्यात?
गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना या सहाही आरोपींचा (डॉक्टर आणि लॅब तंत्रज्ञ) शोध घेता आलेला नाही. सर्व आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसल्याने हा तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी सहजपणे फरार कसे झाले, याबाबत नागरिक आणि तक्रारदार प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
दोन डॉक्टरांचा जामीन अर्ज:
फरार असलेल्या सहा आरोपींपैकी डॉ. गोपाळ बहुरूपी आणि डॉ. सुधीर बोरकर या दोघांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर आता न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असून, पोलिसांना लवकरात लवकर आरोपींना अटक करून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *