सिद्धार्थ कांबळे यांच्या ‘वंचितांचे राजकारण: एक मुक्त चिंतन’ पुस्तकाचे प्रकाशन
ज. वि. पवार यांची ‘संघ की संविधान’ प्रश्नावर परखड मांडणी
कोल्हापूर: लेखक सिद्धार्थ कांबळे लिखित ‘वंचितांचे राजकारण एक मुक्त चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झाले आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि ज्येष्ठ लेखक ज. वि. पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले
यावेळी पार्टीचे संशोधन अधिकारी डॉ. संभाजी बिरांजे आणि वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. क्रांती सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज. वि. पवार यांचे परखड मत
प्रकाशन सोहळ्यात बोलताना ज. वि. पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. आज निष्ठा धुळीला मिळाली असून “निष्ठेत आणि विष्ठेत फारसा फरक राहिलेला नाही” असे मत त्यांनी व्यक्त केले . तसेच, “सध्या देशासमोर संघ की संविधान हा एकच प्रश्न उरला आहे” असे त्यांनी नमूद केले [. पुस्तक वाचल्याशिवाय समाज वाचणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सिद्धार्थ कांबळे यांचे मत
लेखक सिद्धार्थ कांबळे यांनी पुस्तकाविषयी बोलताना ‘वंचित समाजाच्या राजकीय संघर्ष आणि प्रवासाची मांडणी’ पुस्तकात केल्याचे सांगितले . देशातील राजकीय रचना ही सामाजिक रचनेवर आधारित असल्यामुळे, समाजात अजूनही जातीय विषमता आहे. त्यामुळे वंचित समाजाचे स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारण अत्यावश्यक असल्याचं मत त्यांनी मांडले
सत्कार आणि मनोगत
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर, डॉ. क्रांती सावंत आणि प्रा. डॉ. संभाजी बिरांजे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमात लेखक कांबळे यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला
Posted inकोल्हापूर
सिद्धार्थ कांबळे यांच्या ‘वंचितांचे राजकारण: एक मुक्त चिंतन’ पुस्तकाचे प्रकाशनज. वि. पवार यांची ‘संघ की संविधान’ प्रश्नावर परखड मांडणी

