डॉ. मेघा पानसरे यांना ‘भीमाबाई आंबेडकर’ पुरस्कार जाहीर!

डॉ. मेघा पानसरे यांना ‘भीमाबाई आंबेडकर’ पुरस्कार जाहीर!

🏆 डॉ. मेघा पानसरे यांना ‘भीमाबाई आंबेडकर’ पुरस्कार जाहीर!
सातारा – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांची संबोधी प्रतिष्ठान, सातारा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या २७व्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ १९९८ सालापासून साहित्य, कला, संस्कृती व परिवर्तनाच्या चळवळीत मौलिक योगदान देणाऱ्या महिलांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो.
संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे व निमंत्रक दिनकर झिंब्रे यांनी ही माहिती दिली. १० हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि गुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
📅 पुरस्कार वितरण सोहळा
यावर्षीचा २७वा पुरस्कार येत्या ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते डॉ. मेघा पानसरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
✊ डॉ. मेघा पानसरे: संघर्ष आणि योगदान
पुरस्काराच्या मानकरी डॉ. मेघा पानसरे यांचे सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील कार्य महत्त्वपूर्ण आहे:

  • सक्रिय समाजसेविका: त्या शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी स्थापन केलेल्या श्रमिक प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत आणि महाराष्ट्रातील स्त्री-चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
  • न्यायासाठी संघर्ष: कॉम्रेड पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी मोहिमेत त्या सहभागी आहेत आणि न्याय मिळेपर्यंत त्यांचा संघर्ष सुरू आहे.
  • साहित्यिक व भाषिक योगदान:
  • त्यांनी रशियन भाषा विषयक अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.
  • रशियन भाषा साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय ‘सिर्गेइ इसेनीन पुरस्कार’ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाचा ‘तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
  • त्यांनी २० पुस्तकांचे अनुवाद व संपादन केले असून, ४० रशियन कथा-कवितांचा मराठीत अनुवाद प्रसिद्ध केला आहे.
  • राजर्षी शाहू महाराजांचे डॉ. जयसिंगराव पवार लिखित चरित्र त्यांनी रशियन भाषेत अनुवादित केले आहे.
  • सामाजिक उपक्रम: डॉ. मेघा पानसरे यांनी आंतरजातीय – आंतरधर्मीय विवाह केंद्राची स्थापना केली आहे आणि आतापर्यंत सत्यशोधक व साध्या पद्धतीने शंभरावर विवाह लावले आहेत.
    संबोधी प्रतिष्ठानने यापूर्वी डॉ. ज्योती लांजेवार, प्रा. पुष्पा भावे, रजिया पटेल, उर्मिला पवार, पद्मश्री तिस्ता सेटलवाड, डॉ. गेल ऑम्वेट, मेधाताई पाटकर, मुक्ता दाभोलकर अशा अनेक मान्यवर महिलांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
    संघर्षनायक मीडिया, सातारा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *