आझाद समाज पार्टी (कांशीराम) कडून मोठी नियुक्ती! श्री. आनंद शामराव लोंढे सोलापूर जिल्हाध्यक्षपदी!
पंढरपुर :
आझाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षाने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, श्री. आनंद शामराव लोंढे यांची सोलापूर जिल्हाध्यक्ष (जिल्हाप्रमुख) पदी नियुक्ती केली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी/प्रदेशाध्यक्ष डॉ. मानसी पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री. लोंढे यांची ही निवड करण्यात आली आहे. यासंबंधीचे नियुक्ती पत्र दिनांक ०३/११/२०२५ रोजी जारी करण्यात आले.
“छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि महामानव ज्योतिबा फुले यांच्या संकल्पनेतील व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच मान्यवर कांशीराम यांच्या बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही समानतेची विचारधारा पुढे नेण्यासाठी आझाद समाज पार्टी (कांशीराम) चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांच्या सूचनेनुसार तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रभारी/प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आपली सोलापूर जिल्हाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे.”
पक्षाचे महाराष्ट उपाध्यक्ष व पच्छिम महाराष्ट प्रभारी डॉ. मानसी पवार यांनी श्री. लोंढे यांचे अभिनंदन केले असून, ते दिलेली जबाबदारी पूर्ण करतील आणि प्रामाणिकपणे पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळणार असून, बहुजन समाजाच्या हितासाठी पक्षाचे कार्य जोमाने पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
