🗞️ ज्ञानदेव हांडे यांची ‘शिवसेना शिक्षक-शिक्षकेतर सेना’ संघटनेच्या ‘राज्य उपाध्यक्षपदी’ नियुक्ती!
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि संघटनात्मक बांधणीतील सक्रिय भूमिकेबद्दल श्री. ज्ञानदेव लक्ष्मण हांडे सर यांची शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या ‘राज्य उपाध्यक्षपदी’ नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, शिवसेना सचिव श्री. संजयजी मोरे आणि शिवसेना युवा नगरसेवक श्री. किरणभाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.
हांडे सरांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेत्तर सेनेचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार श्री. किशोरजी दराडे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने संघर्ष
ज्ञानदेव हांडे सर यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाचे लढे यशस्वी केले आहेत. ‘प्लॅन टू नॉन-प्लॅन’चा लढा असो, की कोरोना काळात हजारो शिक्षकांसाठी घेतलेल्या ऑनलाइन अध्ययन-अध्यापन कार्यशाळा; त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी मुंबई महानगरपालिका खाजगी शाळांसाठी वेतन अनुदानाच्या मागणीसाठी तसेच शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी अनेक आंदोलने केली आहेत.
आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना ज्ञानदेव हांडे यांनी पक्ष आणि संघटना वाढीसाठी आपण यापुढेही कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन केले. शिक्षण क्षेत्रातून त्यांच्या या संघटनात्मक कार्यासाठी त्यांना सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
