शहापुर तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; वडिलांच्या नावे फेरफार करण्यासाठी ₹ १०,०००/- लाच घेताना रंगेहाथ पकडले!

शहापुर तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; वडिलांच्या नावे फेरफार करण्यासाठी ₹ १०,०००/- लाच घेताना रंगेहाथ पकडले!

इचलकरंजी: वडिलोपार्जित जमिनीच्या ७/१२ पत्रकावर फेरफार करून नाव नोंदवण्यासाठी एका तक्रारदाराकडून २५,०००/- रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठी आणि कोतवाल या दोन लोकसेवकांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कम कोतवाल स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली.
👮‍♂️ कारवाईची माहिती :

  • घटक: कोल्हापूर
  • तक्रारदार: पुरुष, वय ३५ वर्षे
  • आरोपी लोकसेवक:
  • गणेश विष्णुपंत सोनवणे (वय ३२): तलाठी, शहापूर, तालुका हातकणंगले, जि. कोल्हापूर
  • नेताजी केशव पाटील (वय ४५): कोतवाल, शहापूर, तालुका हातकणंगले, जि. कोल्हापूर
  • तक्रार प्राप्त दिनांक: ०६/११/२०२५ (लेखी)
    💰 लाच मागणी आणि स्वीकार:
    तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे गट नंबर ७२९ मधील क्षेत्राचा ७/१२ पत्रकावर फेरफार करून नाव नोंदणी करण्यासाठी आरोपी तलाठी गणेश सोनवणे यांनी ₹ २५,०००/- लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ठरलेली ₹ १०,०००/- इतकी रक्कम त्यांनी कोतवाल नेताजी पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले आणि कोतवाल पाटील यांनी ती रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई करून दोघांना रंगेहाथ पकडले.
    🔎 पुढील तपास आणि कारवाई:
  • जप्ती: आरोपी लोकसेवक गणेश सोनवणे आणि नेताजी पाटील यांचे मोबाईल तातडीने जप्त करण्यात आले आहेत.
  • गुन्हा नोंद: आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कालमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • घरझडती: आरोपी क्रमांक १ आणि २ यांच्या घरझडतीसाठी पथके तात्काळ रवाना करण्यात आली असून घरझडतीची प्रक्रिया सुरु आहे.
  • अटक: आरोपी क्रमांक ०१ व ०२ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
    🌟 एसीबी पथकाची कामगिरी:
  • सापळा अधिकारी: पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, ला.प्र.वि., कोल्हापूर
  • सापळा पथक: पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पो.ह. सुधीर पाटील, पो. कॉ. कृष्णा पाटील, प्रकाश चौगुले, चालक- गजानन कुराडे (ला.प्र.वि. कोल्हापूर)
  • तपास अधिकारी: उज्वला भडकमकर, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. कोल्हापूर.
  • पर्यवेक्षक अधिकारी: वैष्णवी पाटील, पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वि., कोल्हापूर.
    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईमुळे महसूल विभागातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. कोल्हापूर ला.प्र.वि. (ACB) ने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी करत असल्यास, न घाबरता तातडीने तक्रार नोंदवावी.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *