लोकनेते स्व. खासदार बाळासाहेब माने प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शुभहस्ते होणार लोकार्पण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची प्रमुख उपस्थिती
रुकडी फाटा, अतिग्रे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात लोकनेते स्व. खासदार बाळासाहेब माने यांच्या प्रवेशद्वाराचा भव्य लोकार्पण सोहळा येत्या रविवार, दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रुकडी फाटा, अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे पार पडणार आहे.
या सोहळ्याचे शुभहस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नाम. एकनाथजी शिंदेसाहेब (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. खा. श्रीमती निवेदिता संभाजीराव माने (वहिनीसाहेब) (संचालक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, कोल्हापूर जिल्हा) या असतील.
प्रमुख उपस्थिती
या लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने मा. नाम. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदेसो (खासदार, कल्याण लोकसभा), मा. नाम. प्रकाशराव आबिटकरसो (आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री-कोल्हापूर जिल्हा), मा. खा. धैर्यशील संभाजीराव माने (दादा) (खासदार, हातकणंगले लोकसभा) तसेच मा. आ. विनयरावजी कोरे (सावकार) (आमदार, शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा), मा. आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर (आमदार, शिरोळ विधानसभा), मा. आ. अमल महाडिक (आमदार, कोल्हापूर दक्षिण विधानसभा), मा. आ. वंदनाताई कदम (आमदार, विधानपरिषद), मा. आ. सत्यजित देशमुख (आमदार, मिरज विधानसभा), मा. आ. अशोकराव माने, मा. आ. राहुल आवाडे, मा. आ. सुजित मिणचेकर, मा. आ. सुरेश हळवणकर, मा.आ. वेदिका धैर्यशील माने, मा. आ. अमरसिंग का. माने, मा. आ. सत्यशील सं. माने, मा. आ. अभिजीत घेराडे, मा. सौ. निहारिका सत्यशील माने, कु. आदिष्टी धैर्यशील माने, कु. विराजीनी सत्यशील माने हे उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकनेते स्व. खासदार बाळासाहेब माने प्रवेशद्वार सोहळा समिती’ने केले आहे.
स्थळ: रुकडी फाटा, अतिग्रे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
दिनांक व वेळ: रविवार, दि. ०९/११/२०२५, दुपारी ३.०० वा.
हा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एका महत्त्वाच्या नेत्याच्या स्मृतीला आदरांजली वाहणारा ठरणार आहे.
Posted inकोल्हापूर
लोकनेते स्व. खासदार बाळासाहेब माने प्रवेशद्वार लोकार्पण सोहळाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शुभहस्ते होणार लोकार्पण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची प्रमुख उपस्थिती

