पुणे l प्रतिनिधी
रिता इंडिया फाउंडेशन तर्फे “खुशियो के पल, बच्चो के संग” कार्यक्रम दिमाखात साजरा
बाल दिनाचे औचित्य साधत रिता इंडिया फाउंडेशन तर्फे “खुशियो के पल, बच्चो के संग” हा कार्यक्रम तळजाई पठार येथील तळजाई वसाहत, पुणे येथील मुलांबरोबर दिमाखात साजरा करण्यात आला.
रिता इंडिया फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. रिता शेटीया, मयुरी महाकालकर, सारिका यादव यांनी विविध खेळ, ॲक्टिविटी घेऊन मुलांमधील विविध गुण खेळाद्वारे दाखवण्यात आले. सर्व मुले आणि मुलींना बिस्किट्स, चॉकलेट्स आणि शालेय साहित्य वाटप काशिनाथ माझीरे , भूकुम आणि संस्थेच्या विश्वस्त संस्थापिका एच.सी.डॉ . सविता शेटीया यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांनी प्रत्येक ॲक्टिविटी आणि खेळात सहभाग घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.
रिता इंडिया फाउंडेशन नेहमीच गर्ल, वूमन आणि युथ एम्पॉवरमेंट तसेच मेडिकल इमरजन्सी साठी निधी जमवणे असे कार्य करत असते. तसेच कोवीड काळात कर्मचारी वर्ग, तृतीय पंथीय, दीव्यांग यांना जवळपास 1500 अन्नधान्य किट चे वितरण करण्यात आले होते. अश्या प्रकारचे सामाजिक कार्य करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आव्हान डॉ. रिता शेटीया यांनी केले.
या कार्यक्रमास आर्थिक सहाय्य आणि मोलाची साथ दिली ती शोभा सतीशजी कांकरिया, R.O.H.I.T सार्वजनिक ट्रस्ट वसईचे , संस्थापक श्री मंगेश वाघमारे आणि हौसिंग पॉइंट व्यवस्थापन पालघरचे, संस्थापक श्री रोहित शुक्ला, निवेदिता माझीरे, सुप्रिया सातवेकर, उद्धव चव्हाण, संतोष गेडाम, अनुजा गडगे, मर्सी नुअमनीलम, कमलेश पोखर्णा, सारिका यादव आणि सुहासिनी ताई बिवलकर यांनी दिली.
यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य निवेदिता माझिरे, मयुरी महाकालकर, मर्सी नुअमनीलम, सारिका यादव, आणि बच्चे कंपनी श्री माझीरे, गुरू माझीरे, शर्विल यादव यांनी केले. या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून दैनिक लोकशाही आणि दैनिक ईगल न्यूज यांनी काम पाहिले.
यावेळी वरद इंगवले म्हणाला, आज रिता इंडिया फाउंडेशन ने आमच्या बरोबर साजरा केलेला बालदिन आमच्या सगळ्यांच्या लक्षात राहील असाच आहे. त्यांनी घेतलेले खेळ त्यातून आम्हाला मिळालेली शिकवण खूप महत्त्वाची आहे.
अश्विनी राठोड म्हणाली, आम्हाला मिळालेले शालेय साहित्याचे किट आमच्यासाठी खूप उपयोगी आहे. असेच कार्यक्रम पुन्हा आमच्यासाठी रिता इंडिया फाउंडेशन ने भविष्यातही घ्यावे.
तर कार्यक्रमात उपस्थित असलेले काशिनाथ माझीरे म्हणाले, रिता इंडिया फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. यापुढेही फाउंडेशनच्या कार्यक्रमात आवर्जून भाग घ्यायला आवडेल.
