टीईटी पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश! मुख्य सूत्रधारासह एकूण 18 आरोपी अटकेत!कोल्हापूर: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई!

टीईटी पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश! मुख्य सूत्रधारासह एकूण 18 आरोपी अटकेत!कोल्हापूर: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई!

नारायण कांबळे प्रतिनिधी कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (L.C.B.) यश आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत मुख्य आरोपीसह एकूण 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे!
कोल्हापूरचे माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने ही सनसनाटी कारवाई केली आहे.
🕵️‍♀️ कारवाईचा थरार: मध्यरात्री छापा!
टीईटी परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वी देतो असे सांगून काही विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक मूळ कागदपत्रे आणि रोख रक्कम घेऊन फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुरुगूड पोलिसांच्या मदतीने दिनांक 23.11.2025 रोजी मध्यरात्री 01:15 वाजण्याच्या सुमारास, सोनगे (ता. कागल) गावच्या हद्दीतील ‘शिवकृपा फर्निचर मॉल’मध्ये छापा टाकला. या छाप्यात संपूर्ण रॅकेटचा कट उघडकीस आणून फर्दाफाश करण्यात आला.

  • सुरुवातीला, छापा टाकून गुन्हा दाखल केला गेला, तेव्हा घटनास्थळी एकूण 07 आरोपी मिळून आले होते.
  • यावेळी रॅकेटचा मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड, रा. सातारा, हा मात्र फरार होता.
  • याबाबत मुरगूड पोलीस ठाणे येथे भा.नं.स. कलम 318 [4], 62 सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    ⛓️ फरार मुख्य आरोपीसह आणखी 11 अटकेत!
    अटक केलेल्या सात आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड दिनांक 25.11.2025 पर्यंत मंजूर झाल्यानंतर, गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सखोल तपास करण्यात आला.
    या तपासामध्ये गुन्ह्यात सहभागी असलेले आणखी 10 आरोपी आणि फरार असलेला मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड (रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा) याला कराड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
    अटकेतील नवीन 11 आरोपींची नावे:
  • महेश भगवान गायकवाड (मुख्य सूत्रधार)
  • रोहीत पांडुरंग सावंत
  • अभिजीत विष्णू पाटील
  • संदिप भगवान गायकवाड
  • अमोल पांडुरंग जरग
  • स्वप्निल शंकर पोवार
  • रणधीर तुकाराम शेवाळे
  • तेजस दिपक मुळीक
  • प्रणय नवनाथ सुतार
  • संदिप शिवाजी चव्हाण
  • श्रीकांत नथुराम चव्हाण
    आजपर्यंतच्या तपासामध्ये, मुख्य आरोपीसह एकूण 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड दि. 25.11.2025 पर्यंत मंजूर आहे. सध्या गुन्ह्याचा तपास सुरु असून आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
    👏 यशस्वी कामगिरी!
    पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. जालिंदर जाधव, श्री. संतोष गळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी करे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल जाधव यांच्यासह अनेक पोलीस अंमलदारांनी ही उल्लेखनीय कामगिरी यशस्वी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *