क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना: एकल महिलांच्या मुलांसाठी आधार!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना: एकल महिलांच्या मुलांसाठी आधार!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना: एकल महिलांच्या मुलांसाठी आधार!

शिक्षक, शाळा आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती.

एकल महिलांच्या मुलांना दर महिन्याला ₹२,२५०/- बालसंगोपन शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची ही विनंती आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाळांमधून एकल महिलांच्या मुलांची माहिती संकलित केली जात आहे. या महिलांच्या दोन मुला-मुलींना प्रत्येकी ₹२,२५०/- अशी शिष्यवृत्ती दर महिन्याला मिळते.

​ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी शिक्षक, शाळा आणि पालकांनी त्वरित प्रयत्न करावेत. साऊ एकल महिला समितीचे राज्यातील कार्यकर्ते आपल्या जिल्ह्यात यासंदर्भात मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत.

​💡 योजनेची उद्दिष्ट्ये आणि स्वरूप

​महिला व बालविकास विभागामार्फत दि. ३० मे २०२३ च्या शासन निर्णयानुसार “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना” राबविली जात आहे.

  • उद्देश: अनाथ, निराश्रित, बेघर व आपत्तीत असलेल्या बालकांचे संस्थेऐवजी कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे आणि त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी आर्थिक आधार देणे.
  • पात्र लाभार्थी: आई किंवा वडील गमावलेले, तसेच पात्र ठरणारे सर्वसाधारण कुटुंबांतील बालके.
  • योजनेचा लाभ:
    • ० ते १८ वयोगटातील बालकांना.
    • ​एका कुटुंबातील दोन किंवा जास्त बालकांनाही परिस्थिती पाहून लाभ दिला जातो. (कोरोनामध्ये पालक गमावलेल्या कुटुंबासाठी मुलांची संख्या व उत्पन्न अट नाही.)
लाभार्थ्याचा प्रकारप्रति बालकास मिळणारी रक्कम (दरमहा)
एकल महिलेचे बालक₹२,२५०/-
कोरोनामध्ये पालक गमावलेले बालक₹४,०००/-

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

​योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवावी लागतील:

  1. आधार कार्ड (पालकांचे व बालकांचे).
  2. ​शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
  3. ​तहसीलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  4. मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र.
  5. रहिवासी प्रमाणपत्र.
  6. बँक पासबुक.
  7. मृत्यूचा अहवाल.
  8. रेशन कार्ड.
  9. ​घरासमोर पालक व बालकांचे अंगणवाडी सेविकेसमवेत काढलेले छायाचित्र.

​🏦 अर्ज प्रक्रिया आणि मंजुरी

  • अर्ज सादर: हा अर्ज जिल्हा बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो.
  • मंजुरी: समिती लाभार्थ्यांसह पालकांची सुनावणी घेते. मंजुरी मिळाल्यावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत योजनेची अंमलबजावणी होते.

​📞 संपर्क आणि मार्गदर्शन

​योजनेची माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी खालील स्थानिक कार्यालयांशी संपर्क साधावा:

  • तालुका स्तरावर: पंचायत समितीचे बालसंरक्षण अधिकारी.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *