ज. वि. पवार यांच्या ‘आंबेडकरी चळवळ: दशा दुर्दशा आणि दिशा’ पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन

ज. वि. पवार यांच्या ‘आंबेडकरी चळवळ: दशा दुर्दशा आणि दिशा’ पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन

चळवळीला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित

मुंबई: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत ज. वि. पवार यांच्या बहुचर्चित आणि महत्त्वपूर्ण ग्रंथाचे, ‘आंबेडकरी चळवळ: दशा दुर्दशा आणि दिशा’ चे प्रकाशन ४ डिसेंबर २०२५ रोजी दादर येथील ऐतिहासिक आंबेडकर भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडले. गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ चळवळीत सक्रिय सहभाग घेणाऱ्या ज. वि. पवार यांनी अत्यंत समयसूचकता दाखवून हा ग्रंथ लिहिल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या हस्ते प्रकाशन

​या दिमाखदार सोहळ्याचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध लेखिका आणि कार्यकर्त्या दीपा पवार यांनी भूषवले, तर ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या हस्ते ग्रंथाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष मा. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती लाभली.

‘सद् धम्म धम्मदर्शिका’ कॅलेंडरचेही प्रकाशन

​’आंबेडकरी चळवळ: दशा दुर्दशा आणि दिशा’ या ग्रंथाने सद्यस्थितीत चळवळीचे नेमके स्वरूप, आव्हाने आणि भविष्याची दिशा स्पष्ट केली असून, त्याचे महत्त्व सर्वच वक्त्यांनी अधोरेखित केले.

​याच प्रकाशन समारंभात, प्राध्यापक आनंद देवडेकर यांनी संपादित केलेल्या ‘सद् धम्म धम्मदर्शिका’ या कॅलेंडरचे प्रकाशनही डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

​या दिमाखदार सोहळ्यास विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांत प्राध्यापक आनंद देवडेकर, योगीराज बागुल, डॉक्टर श्रीधर पवार, प्रा. विजय मोहिते, प्रा. सुहास चव्हाण, सुबोध मोरे, सुमेध जाधव, प्रा. उत्तम भगत, माजी न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल, निलेश मोहिते, पत्रकार दीपक पवार, अशोक चाफे इत्यादी प्रमुख व्यक्तींचा सहभाग होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *