माणगाववाडीत राज्य उत्पादन शुल्काचा मोठा छापा; २ लाखांहून अधिकचा मुद्देमाल नष्ट

माणगाववाडीत राज्य उत्पादन शुल्काचा मोठा छापा; २ लाखांहून अधिकचा मुद्देमाल नष्ट

माणगाववाडीत राज्य उत्पादन शुल्काचा मोठा छापा; २ लाखांहून अधिकचा मुद्देमाल नष्ट

कोल्हापूर विभागीय भरारी पथक आणि जिल्हा एक्साईजची संयुक्त कारवाई; मद्यतस्करांचे धाबे दणाणले

कोल्हापूर: (प्रतिनिधी) नाताळ, नववर्ष स्वागत आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंद्यांविरुद्ध कंबर कसली आहे. कोल्हापूर विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा अधीक्षक स्नेहलता श्रीकर-नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथे अवैध हातभट्ट्यांवर धडक छापेमारी करण्यात आली. या संयुक्त मोहिमेत सुमारे २ लाख १४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.

चार गुन्हे दाखल, मोठी कारवाई

​महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (एफ) नुसार या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. विभागीय भरारी पथकाचे इन्स्पेक्टर किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. मद्यनिर्मितीसाठी लागणारी रसायने आणि साधने यावेळी पथकाने उद्ध्वस्त केली.

अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा

​या मोहिमेत कोल्हापूर विभागातील विविध क्षेत्रांतील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये:

  • ​कागल निरीक्षक: एस. एस. आंबेरकर
  • ​शाहूवाडी निरीक्षक: किरण बिरादार
  • ​कोल्हापूर शहर निरीक्षक: रोहिदास वाजे
  • ​हातकणंगले निरीक्षक: महेश गायकवाड
  • ​दुय्यम निरीक्षक: रूपाली क्षीरसागर, अजित घोसाळकर, राजेश पाटील व अन्य कर्मचारी सहभागी होते.

मद्यतस्करांमध्ये दहशत

​इन्स्पेक्टर किरण पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २०२५ या वर्षात आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल आणि वाहने जप्त केली आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात मद्यतस्करांविरुद्ध सुरू असलेल्या या बेधडक कारवाईमुळे तस्कर टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. या धडाकेबाज कामगिरीबद्दल किरण पवार आणि त्यांच्या पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *