दत्तवाडच्या नशिबी कोरडठाक ‘दूधगंगा’; पाटबंधारे विभागाच्या जाचाविरुद्ध शेतकऱ्यांचा एल्गार! पाणीपट्टी वसुलीसाठी मोटारी सील केल्याने संतापाचा उद्रेक

दत्तवाडच्या नशिबी कोरडठाक ‘दूधगंगा’; पाटबंधारे विभागाच्या जाचाविरुद्ध शेतकऱ्यांचा एल्गार! पाणीपट्टी वसुलीसाठी मोटारी सील केल्याने संतापाचा उद्रेक

दत्तवाडच्या नशिबी कोरडठाक ‘दूधगंगा’; पाटबंधारे विभागाच्या जाचाविरुद्ध शेतकऱ्यांचा एल्गार! पाणीपट्टी वसुलीसाठी मोटारी सील केल्याने संतापाचा उद्रेक

​दत्तवाड | प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील दूधगंगा नदीकाठावर वसलेले दत्तवाड गाव सध्या भीषण जलसंकटाच्या आणि प्रशासकीय अन्यायाच्या दुहेरी कचाट्यात सापडले आहे. एकीकडे मे महिन्यापूर्वीच नदीपात्र कोरडे पडत असताना, दुसरीकडे थकबाकीच्या नावाखाली पाटबंधारे विभागाने पाणी उपसा करणाऱ्या मोटारी सील करण्याची मोहीम राबवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाविरोधात दत्तवाडमध्ये शेतकऱ्यांची तातडीची बैठक पार पडली असून, प्रशासनाला ‘तीव्र आंदोलनाचा’ इशारा देण्यात आला आहे.
​● प्रशासकीय दडपशाही: पाण्यासाठी टाहो की वसुलीचा पाश?
​नदीला पाणी नसतानाही पाटबंधारे विभागाने अन्यायाने पाणीपट्टी वसुलीसाठी थेट शेतातील वीज (मोटार) कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. आधीच शेती पाण्याविना करपून जात असताना, या ‘दडपशाही’मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी आयोजित बैठकीत अॅड. सुरेश पाटील, राजू पाटील (भाजप उपाध्यक्ष), भैय्या चौगुले यांसह अनेक मान्यवरांनी प्रशासनाचा तीव्र शब्दांत धिक्कार केला.
​● दत्तवाडच्या पाणीटंचाईची ‘पाच’ मुख्य कारणे:
​१. काळमवाडीची गळती व बाष्पीभवन: धरणाची क्षमता असूनही शेवटच्या टोकापर्यंत (Tail-end) पाणी पोहोचण्यास १५ ते २० दिवस लागतात.
२. जीर्ण बंधारे: दत्तवाड-एकसंबा बंधाऱ्यांचे लोखंडी बर्गे सडले असून, लाखो लिटर पाणी गळतीवाटे कर्नाटककडे वाहून जात आहे.तर दत्तवाड – मलिकवाड नुतन बंधाऱ्याचे काम संथ गतीने सुरु आहे
३. सुळकुड योजनेची टांगती तलवार: इचलकरंजीसाठी प्रस्तावित थेट पाईपलाईन योजनेमुळे दत्तवाड परिसर वाळवंट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
४. साखर कारखान्यांचे प्रदूषण: नदीपात्रात सांडपाणी सोडल्याने जलपर्णीचा विळखा वाढला असून पाण्याचा ‘बीओडी’ स्तर खालावला आहे.
५. अवैध उपसा: राधानगरी ते दत्तवाड दरम्यान होणाऱ्या प्रचंड उपसामुळे शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचत नाही.
​”दत्तवाड हे शेवटचे गाव असल्याने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक मिळते. शेती वाळून चालली आहे आणि प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहे. तातडीने मोटारींचे सील काढून पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू.”
— स्थानिक शेतकरी प्रतिनिधी, दत्तवाड.
​● शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
​दत्तवाड बंधाऱ्याचे नूतनीकरण: तातडीने सडलेले बर्गे बदलून गळतीमुक्त यंत्रणा बसवावी.
​सक्तीची वसुली थांबवा: दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणीपट्टी वसुलीसाठी केलेली ‘मोटार सील’ची कारवाई मागे घ्यावी.
​पाणी ऑडिट: नदीपात्रातील पाण्याचे योग्य नियोजन करून टेल-एंडच्या गावांना हक्काचे पाणी द्यावे.
​प्रदूषण नियंत्रण: सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ची सक्ती करावी.
​उपस्थिती:
या बैठकीस शितल सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, प्रकाश वात्रे, विजय नेजे, सुरेश पाटील , मुरगुडे, जितेंद्र हेमगिरे, पप्पा टोपाई यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *