जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. राजेश नाईक यांचे “94” वे रक्तदान

जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. राजेश नाईक यांचे “94” वे रक्तदान

जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. राजेश नाईक यांचे “94” वे रक्तदान

“मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे”, या वाक्याला अनुसरून “जागतिक आरोग्य” दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूरच्या रक्तपेढीमध्ये रक्त संक्रमण अधिकारी डॉ. धनश्री केळकर, डॉ. मुकेशजी वाघमारे, डॉ. हिमांशू पिंपरीकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आशिष पवार, स्टाफ नर्स संजीवनी निकोसे, तन्नू सिंग, विभावरी शेंडे, क्रिष्णाजी पाकमोडे यांच्यासह इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विशेषज्ञ समूह समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सदस्य, डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूरच्या नियामक समिती व कार्यकारी समितीचे सदस्य तथा मा. जिल्हाधिकारी महोदय, नागपूर यांचे प्रतिनिधी, नागपूर शहर केंद्रीय पोलिस शांतता समितीचे सदस्य, अखिल भारतिय मराठी नाट्य परीषद, नागपूर शाखेचे कार्यकारीणी सदस्य आणि श्री मयुरेश जिवनविकास परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेश नाईक यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरच्या रक्तपेढीमध्ये जाऊन आपल्या रक्तदानाची “94” वी फेरी पूर्ण केली.

या निमित्ताने श्री मयुरेश जिवनविकास परिवार संस्थेच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते रक्तदाता कार्ड, रक्तदानाचे प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान करून प्रा. डॉ. राजेश नाईक यांना उपकृत करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *