पत्रकारीतेमध्ये महाराष्ट्र राज्याचा नाव लौकिक! पुण्याच्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या नशाबंदी मोहिमेला आंतरराज्य रेकॉर्डचा बहुमानमुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या सामाजिक निष्ठेचा कर्नाटकात गौरव; जागतिक हॅट्रिकनंतर शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

पत्रकारीतेमध्ये महाराष्ट्र राज्याचा नाव लौकिक! पुण्याच्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या नशाबंदी मोहिमेला आंतरराज्य रेकॉर्डचा बहुमानमुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या सामाजिक निष्ठेचा कर्नाटकात गौरव; जागतिक हॅट्रिकनंतर शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

पत्रकारीतेमध्ये महाराष्ट्र राज्याचा नाव लौकिक! पुण्याच्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या नशाबंदी मोहिमेला आंतरराज्य रेकॉर्डचा बहुमान

मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या सामाजिक निष्ठेचा कर्नाटकात गौरव; जागतिक हॅट्रिकनंतर शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

पुणे, १३ जून :

पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाज परिवर्तनाचे एक प्रभावी अस्त्र आहे, हे पुण्याच्या एका मराठी पत्रकाराने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पुण्यातील प्रसिद्ध वृत्तसंस्था ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ आणि त्याचे मुख्य संपादक श्री. मेहबूब सर्जेखान यांनी मराठी पत्रकारितेची पताका थेट शेजारच्या कर्नाटक राज्यात फडकवली आहे. त्यांच्या सामाजिक जागरूकता पत्रकारितेची दखल घेत ‘कर्नाटक अचीव्हर्स बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या संस्थेने ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ला अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरराज्य रेकॉर्ड पुरस्काराने सन्मानित केले आहे.

विशेष म्हणजे, जागतिक स्तरावर आधीच ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ची दणदणीत ‘हॅट्रिक’ करणाऱ्या या वृत्तसंस्थेच्या खात्यात आता या आंतरराज्य पुरस्काराची मोठी भर पडली आहे.

आजच्या सनसनाटी पत्रकारितेच्या युगात २०१९ मध्ये स्थापन झालेल्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ने सामाजिक बांधिलकीचे भान जपले आहे. तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी संपादक मेहबूब सर्जेखान यांनी थेट ‘नशाबंदी’ची युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली होती. ३ जानेवारी २०२६ ते १६ मार्च २०२६ या केवळ ६८ दिवसांच्या अल्प कालखंडात, त्यांनी आपल्या लेखणीचे अस्त्र उपसून तब्बल १७ प्रबोधनात्मक लेख आणि १ विशेष माहितीपूर्ण चित्रफित इंटरनेट माध्यमांवर प्रसिद्ध केली.

या लेखांमधील शब्द न शब्द समाजात नशाबंदीची जागृती करण्यासाठी आणि व्यसनाच्या गर्तेत गेलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तळमळीने लिहिला होता. त्यांच्या या अत्यंत प्रभावी, शैक्षणिक आणि लेखणीच्या सातत्यपूर्ण तपश्चर्येची दखल अखेर सीमा ओलांडून ‘कर्नाटक अचीव्हर्स बुक ऑफ रेकॉर्ड्स’ला घ्यावी लागली.

एका मराठी पत्रकाराने आणि वृत्तसंस्थेने सामाजिक जाणिवेतून निर्माण केलेल्या या क्रांतीचा हा राष्ट्रीय गौरव मानला जात आहे. समाजाला सुमार्गावर आणण्यासाठी चालवलेल्या या पवित्र लेखणीच्या यज्ञाला मिळालेल्या या आंतरराज्य बहुमानाबद्दल ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ आणि संपादक मेहबूब सर्जेखान यांच्यावर सध्या संपूर्ण महाराष्ट्र आणि पत्रकारिता क्षेत्रातून कौतुकाचा आणि शाबासकीचा वर्षाव होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *