धरणगाव येथील ग्रामपंचायत सचिवाची मनमानी थांबवा ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार

धरणगाव येथील ग्रामपंचायत सचिवाची मनमानी थांबवा ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार

मलकापूर 30/12/21 तालुक्यातील धरणगाव ग्रामपंचायत येथील सचिव निनाजी झालटे हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात न घेताच कारभार करीत असल्याची तक्रार संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मलकापूर यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य रमेश श्रावण झनके यांनी केली आहे.सदर तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की ग्रामपंचायत सचिव निनाजी झालटे हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता नेहमीच ग्रामपंचायतचा कारभार करीत असतात तसेच बऱ्याच वेळा सदस्यांच्या हजेरी रजिस्टर व प्रोसिडिंग वर सह्या घेतात व नंतर प्रोसेडिंग रजिस्टर लिहितात तसेच आज दिनांक 30 डिसेंबर रोजी धरणगाव ग्रामपंचायतचा सन 2022 व 23 चा कृती आराखडा तयार करण्यात आला असून या आराखडा तयार करताना सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेणे बंधनकारक असताना सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
तरी सदर कृती आराखडा सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन नव्याने तयार करण्यात यावा व संबंधित ग्रामपंचायत सचिव यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे ग्रामपंचायत सदस्य मनीषा राजेंद्र झनके, तेजस योगेंद्र पाटील, रमेश श्रावण झनके ,यांनी स्वर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मलकापूर व मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे ऐका तक्रारीद्वारे केली आहे.