राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी समीर जमादार यांची निवड


राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग पश्‍चिम महाराष्ट्र
सरचिटणीसपदी समीर जमादार यांची निवड

इचलकरंजी –
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (अल्पसंख्याक विभाग) पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांनी पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी (अल्पसंख्याक विभाग) राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित समीर जमादार यांची निवड केली आहे. या निवडीचे पत्र नुकतेच समीर जमादार यांना प्रदान करण्यात आले.
तळागाळातील सर्वसामान्यात रुळलेले समीर जमादार हे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची अल्पसंख्याक विभाग पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून निवड केली आहे. या कामी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष आमदार एम. एम. शेख, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील, हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार राजूबाबा आवळे, पश्‍चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ. अमन पटेल, सांगली जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील, ताजुद्दीन खतीब व अन्य पदाधिकार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निवडीबद्दल समीर जमादार यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.