मुझम्मील काझी यांना राज्यस्तरीय रत्नसिंधु आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

⭕ ‘रत्नसिंधु कोकण विभाग कलामंच, महाराष्ट्र’ संस्थेमार्फत होणार सन्मान

रत्नागिरी / प्रतिनिधी

ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाचे संपादक तथा युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अगदी कमी वयातच त्यांनी पत्रकारितेला सुरवात केली.

मुझम्मील काझी यांचा डिजिटल मीडिया हा आवडत विषय असून त्यात हि सामाजिक पत्रकारितेवर काम केले आहे. विविध वेब पोर्टल, न्यूज यूट्यूब चॅनेल, प्रिंट मीडिया अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.

विविध क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाची स्थापना केली. अल्पावधीतच ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडिया उंच भरारी घेतली. त्याचीच दखल घेत संपादक मुझम्मील काझी यांना राज्यस्तरीय रत्नसिंधु आदर्श पुरस्कार 2022 साठी निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील जाधव यांनी दिली.

हा पुरस्कार सन्मान सोहळा रत्नसिंधु कोकण विभाग कलामंच महाराष्ट्र या संस्थेमार्फत दिनांक 10 मार्च 2022 रोजी रत्नागिरी येथे होणार आहे.