महाराष्ट्र कोष्टी समाजाचे वस्त्रोद्योग मंत्री शेख यांना विणकर्‍यांच्या समस्यांचे निवेदन

महाराष्ट्र कोष्टी समाजाचे वस्त्रोद्योग मंत्री शेख यांना विणकर्‍यांच्या समस्यांचे निवेदन

महाराष्ट्र कोष्टी समाजाचे वस्त्रोद्योग मंत्री शेख यांना विणकर्‍यांच्या समस्यांचे निवेदन
इचलकरंजी/प्रतिनिधी –
इचलकरंजी महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई या राज्यव्यापी विणकर्‍यांच्या संघटनेने महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार अस्लम शेख यांना विविध मागण्यांचे निवेदन कोष्टी समाजातर्फे देण्यात आले.
निवेदनात, या राज्यामध्ये अठरा पगड जातीमध्ये विणकर कोष्टी या जातीचे लोक पिढयान्पिढया अनेक वर्षापासून पारंपारिक कापड निर्मितीचा व्यवसाय करीत आहेत. पूर्वी हातमागापासून सध्या आधुनिक शटललेस लूम पर्यंत प्रगती केली आहे. व्यास केंद्र व राज्य शासनाचे सहकार्य लाभले आहेच. राज्यातील बारावेदारांपैकी काही जातीना यापूर्वी सहकार्य जानते आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राव जो कोष्टी जातीचा विणकर आहे तो या बदलत्या परिस्थितीमध्ये मागे पडला आहे. त्यास आज शासन मदतीची गरज आहे. हा व्यवसाय व त्यामध्ये काम करणारे विणकर यांना उर्जितावस्था आणणेसाठी राज्य शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. त्यामध्ये विणकाम व्यवसायातील जादा खर्च हा बीज या घटकाचा असतो. महाराष्ट्र राज्यात मराठवाडा व विदर्भामध्ये वीजदर जो आहे त्याप्रमाणे कोष्टी समाजातील विणकरांना वीजदर सवलत मिळावी. पारंपारिक कोष्टी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे व व्यवसायासाठी वैयक्तिक 20 लक्ष व भागीदारीसाठी 50 लाख रुपये बिनव्याजी कर्ज पुरवठा व्हावा किंवा व्याज राज्य शासनाने द्यावे, वस्त्रोद्योग धोरणामध्ये मुळ पारंपारिक विणकर समाजास वेगळी अतिरिक्त सवलत मिळावी, पॅकेज स्कीम ऑफ इन्सेटिव्हमध्ये पारंपारिक विणकरांना वस्त्रोद्योग सुरू करण्यासाठी दहा टक्के अतिरिक्त लाभ मिळावा या मागण्यांबरोबरच केंद्र स्तरावरील मागण्यांबाबतचे निवेदन वस्त्रोद्योग मंत्री शेख यांना देण्यात आले. मंत्री शेख यांनी, या मागण्यांबाबत संबंधीत अधिकारी व खात्याचे मंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेवू असे आश्‍वासन दिले.
निवेदनावर अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, महासचिव रामचंद्र निर्माणकर, सचिव मिलिंद कांबळे, नगरसेवक संजय कांबळे, सदस्य महेश सातपुते, मनोज खेतमर आदींच्या सह्या आहेत. शिष्टमंडळात उदय चुगड, पीडीएक्सएलचे संचालक गजानन होगाडे, शितल सातपुते, शिरीष कांवळे, दयानंद लिपारे, अरूण वडेकर इत्यादीचा समावेश होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *