महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आयटकच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता जोरदार निदर्शने!
सांगली जिल्हा आरोग्य अधिकारी श्री दिलीप माने यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आलेली आहे की, सप्टेंबर 2021पासून सांगली जिल्ह्यातील दोन हजार आशा व गटप्रवर्तक महिलांचे केलेल्या कामाचे वेतन, दरमहा कोविड भत्ता, ग्रामपंचायतीकडून मिळणारा प्रोत्साहन भत्ता हे काहीच मिळालेले नसल्यामुळे ते ताबडतोब मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
या मागणीबाबत बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी श्री दिलीप माने यांनी सांगितले की. ज्या तालुक्यांमध्ये कामावर आधारित मोबदला अजून मिळालेला नसेल त्यांना आठ दिवसांमध्ये जानेवारी 2021 पर्यंतचा मोबदला देण्यात येईल. तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर 2021 महिन्याचे प्रत्येकी 2 हजार रुपये वाढीव मानधन तेसुद्धा आठ दिवसांमध्ये देण्यात येईल. प्रोत्साहन भत्ता काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर मागण्यांच्या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानकडे सांगली जिल्हा परिषदेमार्फतआजच पत्र पाठवण्यात येईल असे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. यानंतर निदर्शकांच्यां समोर बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये 70 हजार आशा व गटप्रवर्तक महिला काम करीत आहेत त्यांना कोविढ लसीकरणाचां मोबदला अजिबात दिला जात नाही. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ऑगस्ट दोन हजार वीस पासून वाढीव वेतन मागील सात महिन्यापासून आशा व गटप्रवर्तक महिलांना दिलेले नाही.
अनेक ठिकाणी वरिष्ठ आरोग्य अधिकारी कसलाही मोबदला न देताच आशा व गटप्रवर्तक माहीलांच्यावर काम करण्याची सक्ती करून त्यांच्यावर वेठबिगारी लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व अन्यायाविरुद्ध न्याय मिळाला नाही तर पंधरा दिवसानंतर आंदोलन तीव्र करण्यात येईल असे कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले.
या आंदोलनामध्ये इंदुमती येलमर, विद्या कांबळे, राणी लोंढे, राधिका राजमाने, भारती चौगुले, सुनंदा इनामदार, मनीषा पाटील, रेखा परीट, सुनिता कुंभार, वर्षा थोरबोले, सुनीता थोरबोले, सविता भंडारे, कल्पना शिंदे, अनुराधा पोकळे, प्रमिला पाटील, बेबी देशमुख, सुरेखा मंडले, सुनंदा गोळे, सुवर्णा सातपुते, सुवर्णा पाटील इत्यादींनी महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
Posted inसांगली
महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आयटकच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने!
