मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज ईडीने अटक केली आहे. आठ तासांची चौकशी केल्यानंतर मनी लॉन्ड्रींग प्रकरणी त्यांनी अटक करण्यात आली. मात्र, अटक झाल्यानंतरही त्यांनी ईडीच्या कार्यालाबाहेर आल्यानंतर हात उंचावून व्हिक्टरी साईन दाखवली. तसेच, हा फोटो सोशल मीडियावर अपलोड करून ‘झुकेगा नही’ अशी कॅप्शनही दिली आहे. तसेच, ईडीच्या कर्यालयाबाहेरही त्यांनी झुकेगा नही, लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही’,असा नाराही दिला.
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आता मलिकांची कोठडी मिळावी यासाठी ईडी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.