कबनूर प्रतिनिधी / चंदुलाल फकीर
शाहानुरबाबा वेल्फेअर फाऊंडेशन रुईचे अध्यक्ष राज बाणदार यांचा २९ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात कबनूर येथे साजरा झाला वाढदिवसाचे औचित्य साधून शौकत माणगावे यांनी सत्कार प्रसंगी शुभेच्छा देऊन उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य चिंतून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सत्काराला उत्तर म्हणून राज बाणदार यांनी सर्वांचे आभार मानून शाहनुरबाबा वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून कबनूर इचलकरंजी परिसरामध्ये लवकरच वृद्धाश्रम सुरू करणार असून छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू ,साधुसंत, सुफी, वारकरी, सामाजिक,आध्यात्मिक, संस्कृतीक,व्यसनमुक्तीच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील व निराधार व्यक्तीसाठी काम करत राहणार असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रम प्रसंगी ऑल इंडिया हुमन राईटचे शौकत माणगावे ,दीपक पेटकर ,लालचंद पारिक, सुनील कुंभार, श्रीकांत डोणे फेटेवाले, श्रीकांत कांबळे, हनुमंत भागवत,रसूल सय्यद,शमशुद्दीन इनामदार इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी दिपक पेटकर यांनी आभार मानले.