कीव – रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामुळे जगभरातील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहे. युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांत हजारो विदेशी नागरिक अडकले आहेत. त्यात भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांनी घाबरून न जाता धीराने परिस्थिती हाताळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीयांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान बुखारेस्टला रवाना झाले आहे. एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी सकाळी रोमानियाची राजधानी बुखारेस्टसाठी मुंबई विमानतळावरून उड्डाण केले. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्लाइट क्रमांक AI1943 ने मुंबई विमानतळावरून पहाटे 3.40 वाजता उड्डाण केले आहे.