युद्ध संपेल? रशियाने युक्रेनला चर्चेसाठी पाठवले आमंत्रण

युद्ध संपेल? रशियाने युक्रेनला चर्चेसाठी पाठवले आमंत्रण

कीव – युद्धाच्या आज चौथ्या दिवशी रशियन लष्कराने मिसाईलने चौफेर हल्ले चढवत युक्रोनच्या खारकीर आणि राजधानी कीव शहरावर आणखी घट्ट वेढा घातला. मात्र येथे दोन लष्करांमध्ये जोरदार घमासान सुरु असताना आता युक्रोनला बेलारुसमध्ये चर्चा करण्यासाठी रशियन शिष्टमंडळाने आमंत्रण दिले. आम्ही चर्चा करायला तयार आहोत, मात्र बैठक बेलारुसमघ्ये नको, दुसर्‍या ठिकाणी द्या, अशी अट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी घातली. आता दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु होणार असल्याने युद्धाचे ढग काही प्रमाणात हटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आजही युक्रेनमघ्ये रशियन लष्कर आणि लढाऊ विमानांनी राजधानी कीव आणि खारकीर शहरावर मिसाईल टागून आपले हल्ले सुरुच ठेवले होते. या दोन्ही शहरांच्या वेशीवर उभ्या असलेल्या रशियन लष्कराने कीव शहरातील ऑईल डेपोवर मिसाईलने हल्ला करुन डेपो उडवून दिला. तर खारकीरमध्ये गॅस पाईपलाईन उद्ध्वस्त केली. अशा परिस्थितीत देखील आजही युक्रेनच्या लष्काराने रशियन लष्कराला कीव आणि खारकीर शहरात घुसू दिले नाही. या हल्ल्यात युक्रोनचे लढाऊ विमान आणि रणगाडे उडवून दिले. तर काही रणगाड्यांना मोेठे नुकसान झाले. युक्रोनचे 223 रणगाडे आणि 28 विमाने, 39 एकाधिक रॉकेट लाँचर, 86 फील्ड आर्टिलरी माउंट्स आणि मोर्टार, 143 विशेष लष्करी वाहने रशियन लष्कराने नष्ट केली आहे.

तर दुसरीकडे जोरदार संघर्ष करुनही युक्रेनच्या लष्कराने नोव्हा काखोव्का भाग गमावला. युक्रोन रोज कोणता ना कोणता भूभाग गमावत आहे. तर युक्रेनला वाचवण्यासाठी मित्रदेश मोठा प्रमाणात शस्त्रसाठा पुरवत आहे. तसेच जगभरातील अनेक देश या हल्ल्याच्या निषेधात रशियावर निर्बंध लादत आहेत. फ्रॉन्स, इटली, जर्मनी, कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिका रशियन प्रवासी आणि माल हवाई वाहतूक मार्ग बंद केला आहे. या देशांनी इंटरनेटवर आणि अन्य बाबींवर निर्बध घातले असताना रशियन शिष्टमंडळाने आज युक्रोनला बेलारुसमध्ये चर्चेचे आमंत्रण दिले आहे. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी चर्चेसाठी आम्ही तयार असल्याच म्हटले. आम्हाला युद्ध संपवायचे आहे. मात्र बेलारूसमध्ये आम्ही चर्चेला तयार नाही, कारण बेलारूसचा हल्ल्यासाठी लाँचपॅड म्हणून वापर जात आहे. बेलारूसऐवजी वारसॉ, ब्रातिस्लावा, बुडापेस्ट, इन्स्ताबुल किंवा बाकु यापैकी कोणत्याही ठिकाणी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. मात्र आता रशिया युक्रोनची मागणी मान्य करतो काय? हे आता लवकरच समजेल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *