इचलकरंजी/प्रतिनिधी – .
माणकापूर (ता. निपाणी) येथील निसर्गराजा ग्रुपचा यावर्षी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार येथील अस्लम बादशहा जमादार यांना तर सुरेश शिवाजी पोवार यांना राज्यस्तरीय आदर्श कामगार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. जमादार आणि पोवार हे जवाहर साखर कारखान्याचे कर्मचारी असून त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
निसर्गराजा ग्रुपच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींचा राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने गौरव केला जातो. या ग्रुपच्यावतीने यावर्षीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये अस्लम जमादार यांना समाजरत्न तर शिवाजी पोवार यांना आदर्श कामगार पुरस्कार जाहीर झाला आहे. महाशिवरात्री यात्रा व जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून 1 मार्च रोजी सकाळी 11 वाजता श्री मलकारसिध्द मंदिर, माणकापुर येथे हा 17 वा राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती निसर्गराजा ग्रुपचे अध्यक्ष शिवाजी येडवान यांनी दिली.
