समर्थ रामदास नसते तर शिवाजींना कोणी विचारलं नसतं; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच वादग्रस्त वक्तव्य
समर्थांशिवाय शिवाजी महाराजंना कोण ओळखणार अस वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. औरंगाबादमध्ये मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यपालांनी हे वक्तव्य केल आहे.
औरंगाबादमध्ये समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की आज मराठी भाषा गौरव दिवस आहे, तसेच यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. आयुष्यात प्रत्येकाला गुरु गरजेचा आहे. चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही तसंच समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत याचा अर्थ त्यांच कर्तृत्व कमी होत असा नाही, पण गुरूशिवाय आपल्या जीवनाला पूर्णत्व येत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरु गरजेचे आहेत.अस विधान राज्यपालांनी केल आहे.
राज्यपालांच्या या वकत्व्यानंतर चर्चेला उधान आल असुन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी टिका केली असून राज्यपाल चुकीचा इतिहास सांगत सांगत आहेत. त्यांनी घातलेल्या काळ्या टोपीखालच्या मेंदुतुन जाणीवपूर्वक संघाचे विचार पसरवले जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.तर हिंदु महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.पण रामदास स्वामी यांचा सन्मान शिवाजी महाराज करत होते तसे पत्र पुरावे उपलब्ध आहेत.पण महाराजांचा अवमान राज्यपालांनी केला आहे त्याचा निषेध दवे यांनी नोंदवला आहे.