रत्नागिरी : वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी (उत्तर ) जिल्ह्याच्या वतीने गुहागर येथील गोल्डन पार्क, जाणवली फाटा शृंगारतळी येथे वंचित बहुजन आघाडी चषक आयोजित करण्यात आला आहे. या भव्य ओव्हर आर्म स्पर्धचे उद्घाटन शुक्रवार दि. 18 मार्च 2022 रोजी सकाळी रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष विकास (अण्णा) जाधव यांच्या हस्ते पार पडणार आहे.
या स्पर्धेला वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी (उत्तर) जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तसेच गुहागर तालुकाध्यक्ष नामदेव धुमाळ , महासचिव भूषण पवार, सदस्य सुजय पवार आदी उपस्थित राहणार आहे. क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५०,०००/- , द्वितीय २५,०००/- तसेच ‘मॅन ऑफ दि सिरीज’साठी सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या वीस संघांना प्राधान्य देण्यात येणार असून प्रवेश फी ३,०००/- रुपये आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भूषण पवार ९१३०४५३५९७ , ओंकार पेंढाबकर ८८०५६५०९५२ यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.