साजणी येथे जमिनीच्या वादातून कुर्हाडीने सपासप वार करून धक्कादायक खून
कबनूर -(प्रतिनिधी चंदुलाल फकीर) साजणी येथे आज सकाळी ११च्या दरम्यान मुन्नाफ सत्तारमेकर वय वर्षे ६५ राहणार कबनूर यांचा धाारदार कुर्हाडीने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबतची माहिती अशी की कबनूर येथील मुनाफ सतारमेकर यांनी साजणी येथे जमीन घेतलेली आहे सदर जमिनीच्या बांधा बाबतचा वाद कोर्टात सुरू होता सदर वादाचा निकाल सातारकर यांच्या बाजूने लागला आहे मुनाफ सतारमेकर सकाळी शेतात गेले असता शेजाऱ्यांनी कुर्हाडीने सपासप वार करून त्यांचा खून करून यातील संशयित हल्लेखोर नितीन कोनेरे राहणार साजणी स्वतःहून हातकणंगले पोलिसात हजर झाला घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस निरीक्षक के.एन. पाटील सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून इचलकरंजी विभाग पोलीस उपअधीक्षक बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.
साजणी येथे जमिनीच्या वादातून कुर्हाडीने सपासप वार करून धक्कादायक खून
