मुंबई : बुद्धी आणि ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणारा कोण होणार करोडपती चा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येकजण पाहतो पण हे सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे स्वबळावर आणि ज्ञानावर मिळणाऱ्या यशाची चव चाखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा . कारण लवकरच येतोय कोण होणार करोडपतीचा पुढचा सिझन हीच आहे वेळ धनलक्ष्मी,प्रतिष्ठा प्रेक्षकांची मनं जिंकण्याची आणि कोण होणार करोडपती’ या जगविख्यात कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे.
सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा मराठी रियॅलिटी शो अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. मनोरंजनासोबत ज्ञानार्जन’ हे वैशिष्ट्यं असणार्या या कार्यक्रमात स्वत:ला अवगत अ सलेलं आणि मिळवलेलं ज्ञान तुम्हाला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं याची प्रचिती मागील दोन सिझनमुळे सगळ्यांना आली. यंदाही कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर सूत्रसंचालन करणार आहेत . स्वतःचा अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर सहभागिंशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम मोठ्या खुबीने करतात , त्यामुळे स्पर्धेतील यंदाही ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर सूत्रसंचालन करणार आहेत.
स्वत:च्या अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर स्पर्धेतील सहभागींशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम मोठ्या खुबीने करतात. त्यामुळे स्पर्धेतील सहभागी स्पर्धक आत्मविश्वासाने खेळअधिक चांगल्या प्रकारे खेळू शकतात.मागच्या वर्षी सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना १० प्रश्न विचारले जात होते. पण यंदा १४ दिवस १४ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. जितके जास्त प्रश्न तितक्याच जास्त संधी. त्यामुळे ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमामध्ये त्वरित सहभागी व्हा. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २३ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. २३ फेब्रुवारी पासून सुरु झालेले हे प्रश्न, ८ मार्च पर्यंत विचारण्यात येणार असून
७०३९०७७७७२ या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह अँपवर जाऊन प्रेक्षक स्वतःची नोंदणी करून घेऊ शकतात.करोडपती होण्याचं तुमचं स्वप्न आता खऱ्या अर्थाने साकार होऊ शकतं. ज्ञान, मनोरंजन आणि रसिकप्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यासाठी तयार रहा. कारण सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येत आहे, ‘कोण होणार करोडपती’!