ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उंद्रीत दाखविले काळे झेंडे

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उंद्रीत दाखविले काळे झेंडे

चिखली : रब्बी हंगामात वीज वितरण कंपनीने निर्दयीपणे वीज कापून शेतातील पिकांना ऐनवेळी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या निषेधार्थ चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उंद्रीत काळे झेंडे दाखवून विज वितरण कंपनीच्या निर्दयीपणाचा निषेध केला.

काल (दि. 28) ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. यावर्षी रब्बी हंगामात विज वितरण कंपनीने कृषिपंपाच्या थकबाकी वसुलीसाठी वीज जोडणी कट करण्याचा सपाटा लावला होता. ऐन हंगामात पिकांना पाणी देता आले नाही. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता असे करणे हे नियमबाह्यपणे आहे. विज वितरण कंपनीने पठाणी, सुलतानी व तालिबानी वसुली केली. वीज खम्ब्यावरून न कपाता केंद्रावरून कट करून शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी कृती केली. त्यामुळे जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे फार नुकसान झालेले आहे. त्यामुळे चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या
झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, शेतकऱ्यांची वीज कट करणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांचा जाहीर निषेध, Go बॅक go बॅक नितिन राऊत go बॅक अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *