महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज चांगलेच गाजले. अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधकांनी नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. तर, दुसरीकडे राज्यपालांचे अभिभाषण सुरू होताच सत्ताधारी आमदारांनी सभागृह दणाणून सोडला. त्यामुळे राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले. राज्यपाल राष्ट्रगीतासाठीही थांबले नाहीत. राज्यपालांच्या या कृतीचा विविध प्रकारे निषेध सत्ताधारी पक्षाकडून नोंदवला जातो आहे. संजय दौंड यांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं. शीर्षासन करत त्यांनी राज्यपालांच्या कृतीचा निषेध नोंदवला.
राज्यपाल म्हणजे काय? खाली डोकं वर पाय अशा घोषणा वेळी देण्यात आल्या. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रगीताचा सन्मान केला नाही. तसंच महाविकास आघाडी सरकारने जे चांगलं काम केलं आहे ते राज्यपालांना वाचायचं नव्हतं त्यामुळेच त्यांनी भाषण तीस सेकंदात पटलावर ठेवलं असाही आरोप संजय दौंड यांनी केला आहे.