⭕वंचितच्या राजकारणात महिलांचा सहभाग महत्वाचा : जिल्हा निरीक्षक स्मिता गवाळे
रत्नागिरी : वंचित बहुजन महिला आघाडीची बैठक (दिनांक 3 मार्च 2020 रोजी) चिपळूण तालुक्यातील धमनवने येथील सभागृहात वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी जिल्हा निरीक्षक सौ. स्मिता गवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व सौ. क्रांती कदम, सौ. सविता मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
सदर बैठकीच्या सुरवातीला सौ स्मिता गवाळे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व महिला कार्यकर्त्यांशी ओळख व बैठकीत पक्ष संघटनात्मक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.
◾ महिला आघाडीचा सहभाग महत्वाचा
या बैठकीत रत्नागिरी जिल्हा निरीक्षक स्मिता गवाळे मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि, जिल्ह्यातील बहुजन चळवळीतील महिलांनी न घाबरता राजकारणाच्या प्रक्रियेत वंचित बहुजन महिला आघाडीत सहभागी व्हावे. मजबूत बांधणीसाठी जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असणे महत्वाचे आहे. तसेच सर्वांनी एकजुटीने काम केल्यास वंचित बहुजन आघाडीची रत्नागिरी जिल्ह्यात ताकद वाढेल व महिला आघाडी हि अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी रिया रुपेश सावंत, सुप्रिया सुभाष जाधव, सुवर्णा संजय जाधव, रंजना धर्मा पवार, सितेश्री संतोष गमरे, प्रतिभा सुनील सावंत, कविता सुनील जाधव, सुनिता चरण जाधव, सुजाता महेंद्र मोहिते, सुवर्णा कचंद्रकांत मोहिते आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.